गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक

मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करत असतो; पण सखोल जागी पाणी साठते आणि ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते

गुरुकृपा सतत हवी !

गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करीत रहाणे आवश्यक असते.               

गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक

गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषीमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.

गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्लक

ज्याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभी लहान शब्द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू पावले टाकायला शिकवतात, तसेच गुरुही शिष्याला टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकवतात.   

गुरुपौर्णिमेला २० दिवस शिल्लक

आपल्या गुरूंकडून आणि इतर संतांकडून जे ज्ञान मिळाले, ते शिष्याला उदार हस्ते देण्याची गुरूंना तळमळ असते.              

गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक

मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध  भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते. 

गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.

गुरुपौर्णिमेला २३ दिवस शिल्लक

गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.