अजानची स्पर्धा काफिरांनी आयोजित करणे इस्लामला मान्य आहे का ? अशी स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी ‘इस्लामी धर्मगुरूंचे मत काय आहे ?’, हे जाणून घेतले असते, तरी ही स्पर्धा आयोजित करण्याचा खटाटोप केला नसता !
मुंबई – येथे मुसलमान समाजातील मुलांसाठी दक्षिण मुंबईतील पांडुरंग सकपाळ यांनी ‘ऑनलाईन’ अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या मुलांसाठी आवाज, उच्चार आणि किती मिनिटांमध्ये अजान संपवतात, यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पहातील. प्रेम आणि शांती यांचे ते प्रतीक आहे. त्यावर वाद घालणे उचित वाटत नाही. मुसलमान समाजातील मुलांना अजानची गोडी लागावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. अजान केवळ ५ मिनिटांची असते. त्यामुळे कुणाला त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. माझ्या घराजवळ मुसलमान वस्ती आहे. मला नियमित अजान ऐकू येते. अजानमध्ये गोडवा असून त्यामुळे मन:शांती मिळते. त्यामुळे मुसलमान समाजातील मुलांसाठी ही स्पर्धा घेण्याचे माझ्या मनात आले, असे आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेचे आयोजन करणारे पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेचे राजकीय नेते आहेत.