तिसर्या महायुद्धाच्या काळात वाचण्यासाठी साधना करा !
भक्ताला म्हणजे साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्या महायुद्धात वाचवील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भक्ताला म्हणजे साधना करणार्यालाच देव वाचवतो. हे लक्षात घेऊन आतापासून तीव्र साधना करा, तरच देव तिसर्या महायुद्धात वाचवील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आपल्या प्रत्येक कृतीत शिष्यभाव असायला हवा. इतरांशी बोलतांना आपली वाणीही शिष्यभावात असायला हवी, म्हणजेच नम्र असायला हवी. आपल्या वाणीमुळेच दुसर्याची वाणी आपल्याला ‘तथास्तु’ म्हणत असते.
प्रारब्धभोगाची तीव्रता अल्प करून आनंद उपभोगण्यासाठी साधना हाच उपाय असणे
अन्न हे पवित्र घरचे आणि पवित्र भावनेने केलेले अन् पवित्र धान्यांचे असावे. अन्नाप्रमाणे मन बनते. जेवतांना चालू असलेल्या विचारांचे संस्कार अन्नरसावर होतात आणि तेच पुढे आपल्या प्रकृतीतही रुजू लागतात.
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही;कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
जो साधक ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.
‘पूर्वी लाच घेणारा शोधावा लागत असे. आता लाच न घेणारा शोधावा लागतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परेच्छेने किंवा ईश्वरेच्छेने वागतांना आरंभी त्याचा त्रास झाला, तरी त्यातून साधना होते आणि पुढे त्यातून आनंदाची प्राप्ती होते.
सर्वांच्याच भूमिका एकसारख्या नसल्यामुळे त्या त्या भूमिकेच्या माणसांनाही मार्गदर्शन होण्यासाठी निरनिराळा उपाय सांगून ठेवावा लागतो, निरनिराळे; पण शास्त्रीयच आचार सांगावे लागतात.
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले