हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !
‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अशिक्षिताने ‘सूक्ष्म जंतू नाहीत’, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’ असे म्हणणे हास्यास्पद आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात. हा नामजप त्या साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक/पूरक असतो, तसेच त्या जपामागे गुरूंचा संकल्पही कार्यरत असतो.
‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’
‘स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकप्रतिनिधी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणारे होते. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या उत्तरदायित्वाचा नाही, तर केवळ स्वार्थाचाच विचार करणार्या लोकप्रतिनिधींची संख्या वाढत गेल्याने राष्ट्राची केविलवाणी स्थिती झाली आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर विचार करणार्यांना काळजी वाटते, ‘पुढे हिंदु अल्पसंख्यांक होणार.’ याउलट आध्यात्मिक स्तरावर विचार करणार्यांना कळते की, कालचक्रानुसार पुढे हिंदु धर्म असणार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मद्रोही आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मानवाने व्यक्तीस्वातंत्र्य विसरून टप्प्याटप्प्याने कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार करून वागणे, म्हणजेच टप्प्याटप्प्याने परेच्छेने वागणे, असे वागला, तरच तो खर्या अर्थाने मानव असतो, नाहीतर… – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘विज्ञानाने सिगारेट, दारू इत्यादींचे दुष्परिणाम सिद्ध केलेले असूनही धर्मद्रोही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांसंदर्भात मोहीम उघडत नाहीत. मटका, जुगार यांसंदर्भातही मोहीम न उघडता केवळ हिंदु धर्माविरुद्ध मोहीम उघडून स्वतःला ‘पुरोगामी’ म्हणवतात, हे लक्षात घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु धर्म सोडून इतर धर्मांचा (पंथांचा) इतिहास पाहिला, तर त्यात विविध काळांत केलेल्या लाखो हत्यांच्या, क्रूरतेच्या, बलात्कारांच्या, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या सहस्रो नोंदी आहेत . . . हिंदु धर्माच्या इतिहासात असे एकही उदाहरण नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आंधळ्याचे ‘माझ्या पाठून या’ हे सांगणे ऐकणारे ज्याप्रमाणे त्याच्यामागून खड्ड्यात पडतात, तसे बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी यांचे आहे. ते दिशाहीनतेमुळे स्वतः खड्ड्यात पडतात आणि त्यांच्यामागून जाणारेही खड्ड्यात पडतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले