आषाढी एकादशीला पंढरपूर मंदिरात लोकप्रतिनिधींसाठीचे ‘व्ही.आय्.पी.’ दर्शन बंद !

‘अतीमहनीय असणे’ हा देवाच्या दर्शनासाठीचा निकष नको, तर ‘भक्त असणे’, हा निकष हवा !

७ जुलैपर्यंत दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिर २४ घंटे खुले रहाणार !

आषाढी यात्रेसाठी येणार्‍या अधिकाधिक भाविकांना श्री विठ्ठलाचे पदस्‍पर्श दर्शन आणि मुख दर्शन घेता यावे यासाठी २० जूनपासून २४ घंटे दर्शन व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या रायरेश्‍वर गडावरून दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्‍थान !

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्‍वराज्‍या’ची शपथ घेतलेल्‍या रायरेश्‍वर गड येथून पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्‍थान झाले.

आषाढी यात्रेसाठी २१ जूनपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्‍यात येणार !

आषाढी एकादशीचा सोहळा २९ जून या दिवशी होणार आहे. त्‍यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्‍ये २१ जूनपासून पाणी सोडण्‍यात येणार आहे, तर २९ जून या दिवशी बंद करण्‍यात येणार आहे

आषाढी यात्रेच्‍या निमित्ताने दर्शन रांगेत यंदा १२ छतांची उभारणी !

यंदाच्‍या वर्षी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीकडून दर्शनरांगेत एकूण १२ छते उभारण्‍यात येणार आहेत. या छतांमुळे एकाच वेळी अनुमाने १२ सहस्र भाविकांचे ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होईल.

पाऊले चालती पंढरीची वाट

वारकरी संप्रदायात आषाढी वारीला महत्त्वाचे स्‍थान आहे. सर्व संत वारकरी होते. संत तुकाराम महाराज म्‍हणतात, ‘होय होय वारकरी । जाय जाय तूं पंढरी  ।’ या वारीला कशासाठी जायचे ? वारी ही सामूहिक (समष्‍टी) साधना आहे. त्‍यात संयम आणि शिस्‍त शिकायला मिळते, अहंकाराचा नाश होतो आणि परमार्थातील प्रगतीला गती मिळते.

जंगली महाराज रस्‍ता येथे येथे पू. भिडेगुरुजींनी केले पालखीचे सारथ्‍य !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे संस्‍थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी जंगली महाराज रस्‍ता येथे संतश्रेष्‍ठ तुकाराम महाराज यांच्‍या पालखीचे सारथ्‍य केले. या वेळी सहस्रोंच्‍या संख्‍येने धारकरी उपस्‍थित होते.

वारीचे स्‍वरूप बदलले असले, तरी आजही त्‍याचा आत्‍मा कायम आहे ! – डॉ. गो.बं. देगलूरकर

समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे ही त्‍या काळाची आवश्‍यकता होती. त्‍यामुळे त्‍या वेळच्‍या संतांनी आपापले संप्रदाय बाजूला ठेवून सर्वांचा एकच देव म्‍हणजे विठ्ठल हे तत्त्व मान्‍य केले आणि तेव्‍हापासून वारीला आरंभ झाला असे देगलूरकर यांनी सांगितले.

पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !

पंढरीची नित्‍य वारी, गळ्‍यात तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाणभूत असलेल्‍या ग्रंथांचे वाचन, पठण, नामस्‍मरण नामसंकीर्तन, विठ्ठल हेच दैवत, सहिष्‍णुता, सदाचार, शाकाहार, व्‍यसनहीनता ही वारकरी पंथाची काही वैशिष्‍ट्ये सांगता येतील.

आषाढी वारीसाठी प्रस्‍थान सोहळ्‍याची देहू आणि आळंदीतील संस्‍थानकडून जय्‍यत सिद्धता !

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्‍या ४ दिवसांवर आहे. जगद़्‍गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्‍या १० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्‍थान ठेवणार आहे.