माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची नित्योपचार पूजा पार पडली 

माघ एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे यांच्या उपस्थितीत, तर श्री रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

माघ द्वादशीलाही श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद रहाणार !

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने २४ फेब्रुवारी (माघ शुक्ल पक्ष द्वादशी) या दिवशी श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

वृद्ध, अपंग आणि रुग्ण भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २ ई-रिक्शा भेट !

दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी माधवी निगडे वेल्फेअर फाऊंडेशन आणि वेणू सोपान वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने गिअर बॉक्स असलेल्या बॅटरीवर धावणार्‍या २ ई-रिक्शा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याचा सोहळा २१ फेब्रुवारीला ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या हस्ते पार पडला.

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरातील गावांमध्ये २४ घंट्यांसाठी संचारबंदी

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे २३ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या माघ वारीच्या पार्श्‍वभूमीवर २२ फेब्रुवारीच्या रात्री १२ पासून ते २३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत २४ घंट्यांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनामुळे यात्राकाळात भाविकांना शहर प्रवेश बंदी असणार आहे

मागील ४ वर्षांपासून स्ट्रेचरवर असलेले डॉ. होमकर यांना लाभले श्रीविठ्ठलाचे दर्शन

मागील ४ वर्षांपासून स्ट्रेचरवर असलेले सोलापूर येथील श्रीविठ्ठलभक्त डॉ. राजाराम होमकर यांची श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. डॉ. होमकर यांची श्रीविठ्ठल दर्शनाची पुष्कळ दिवसांपासून इच्छा होती.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मंत्रोच्चार आणि मंगलाष्टक यांच्या गजरात उपस्थितांनी अक्षता वाहिल्या.

माघ वारीच्या पार्श्‍वभूमीवर दशमी – एकादशीला पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन बंद रहाणार

कोरोनामुळे दशमी आणि एकादशी या दिवशी श्री विठ्ठलाचे दर्शन बंद रहाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे पार पडली.

दळणवळण बंदीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कह्यात घेतली ११७ एकर भूमी !

देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

माघ वारी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वारकर्‍यांनी घेतली भेट

कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्याने अनेक सार्वजनिक उपक्रम चालू झाले आहेत. मंदिरेही दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच लसीकरणाची मोहीमही चालू करण्यात आली आहे. नियम आणि अटी पाळून वारकर्‍यांना वारीसाठी संमती मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.

श्री विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकींगची आवश्यकता नाही

ओळखपत्र दाखवून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यास प्रारंभ