३० मार्चपर्यंत आवश्यक त्या सुविधा न दिल्यास पेट्रोलपंपांवर होणार कारवाई !

स्वच्छ प्रसाधनगृह, वाहनतळ, वाहनांकरता हवा भरण्याची निःशुल्क सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि प्रथमोपचार पेटी प्रत्येक पेट्रोलपंपांवर असणे आवश्यक आहे, ज्यावर अशा सुविधा नसतील, त्यांवर धडक कारवाई केली जाणार.

हिंदु म्हणून एकत्र या अन् भगव्याची ताकद जगाला दाखवा !  

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कस जगावे ? हे शिकवले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसे मरावे ? हे शिकवले. हेच राजे आपले आदर्श आहेत.

व्यापारी, नागरिक यांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करू ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

सर्वांना विश्वासात घेऊनच श्री महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास साध्य करू, असे आश्वासन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ‘महाद्वार रोड व्यापारी आणि रहिवासी असोसिएशन’च्या सभासदांना दिले.

अनिल परब यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांसह म्हाडाच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला !

अनिल परब यांनी म्हाडाची भूमी हडपल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांप्रकरणी परब यांना म्हाडाच्या वतीने नोटीसही देण्यात आली होती; पण नंतर म्हाडाने ती नोटीस मागे घेतली.

उद्योजक सदानंद कदम यांना १५ मार्चपर्यंत ‘ईडी’ची कोठडी !

‘ईडी’ने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून १ कोटी रुपये विभास साठे यांना दिले गेल्याचे उघड झाले आहे. सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले ! 

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

दापोली (रत्नागिरी) : ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना महावितरण उपकार्यकारी अभियंता विंचूरकर याला पकडले !

अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

पारोळा (जळगाव) जलसंधारण उपविभागातील उपअभियंत्यावर निलंबनाची कारवाई !

तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनीही चौकशी चालू असतांना दोषी अधिकार्‍यांना पदावर ठेवणे उचित नसल्याचे निर्देश दिले. शेवटी डॉ. तानाजी सावंत यांनी दोषी उपअभियंत्याच्या निलंबनाची घोषणा केली.

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने’तून ५ लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार !

राज्यात आयुर्वेदासह विविध उपचारपद्धती आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मात्र त्यांचा समावेश करण्यात आलेले नाही, असे नमूद करत शासकीय योजनेत आयुर्वेद उपचारपद्धतीचा सामावेश करण्याची मागणी केली.

अवकाळी पावसामुळे झालेल्या हानी भरपाईसाठी विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग !

मुख्यमंत्र्यांनी हानीची ठिकाणे सांगितली, त्यामध्ये कोकण आणि विदर्भ येथील काही ठिकाणांचा समावेश नाही. सरकारकडून अद्यापही कांद्याची खरेदी चालू करण्यात आलेली नाही, अशी माहिती सभागृहात दिली.