सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका करणार नाही ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

‘स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मासागवर्गीय समाजाला आरक्षण मिळावे’, ही सरकारची भूमिका स्पष्ट आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात मतदान होणे शक्य नाही ! – राज्य निवडणूक आयोग

निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती देतांना किरण कुरुंदकर म्हणाले, ‘‘प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदान सूची करणे आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा अशा ४ टप्प्यांत निवडणूक होते.

मी कोणताही नवीन पक्ष स्थापन करणार नाही ! – प्रशांत किशोर, निवडणूक रणनीतीकार

बिहारला आगामी काळात आघाडीच्या राज्यांच्या सूचीमध्ये यायचे असेल, तर त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.

आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; पण भाजप ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

काही काळापूर्वी भाजपने त्या खुल्या झालेल्या ओबीसींच्या जागेवर ओबीसींनाच तिकिटे देऊन निवडून आणले होते.

पुढील आठवड्यात महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला आदेश

ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने नवीन विधेयकाद्वारे कायदा संमत करत राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले होते. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा विजय !

पंतप्रधान मोदी यांच्याकडून मॅक्रॉन यांचे अभिनंदन !

राष्ट्राध्यपदाच्या उमेदवार मरीन ली पेन यांच्यावर आर्थिक अपव्यवहाराचे आरोप !

मरीन ली पेन अन् त्यांचे सहकारी यांनी ६ लाख २० सहस्र युरोचा अपव्यवहार केला, असे तेथील ‘मिडियापार्ट’ नावाच्या अन्वेषण करणार्‍या एका आस्थापनाने म्हटले आहे.

४ राज्यांतील ४ विधानसभा आणि १ लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधकांना यश

महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचा उमेदवार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार विजयी झाला.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत ६१ टक्के मतदान !

कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी १२ एप्रिल या दिवशी चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव, तर भाजपकडून सत्यजित कदम हे निवडणूक लढवत आहेत.

सत्तेत आलो, तर सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करू !

फ्रान्सच्या निवडणुकीतही हिजाब घालणार्‍यांकडून दंड वसूल करण्याचे आश्‍वासन दिले जाते. ही भारतातील तथाकथित पुरो(अधो)गामी आणि विज्ञानवादी यांना चपराकच होय !