हा हिंदुत्वाचा विजय !

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला. मतदारांचा एकूणच कल पहाता यंदाच्या निवडणुकीत आक्रमक आणि रोखठोक हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्व यांना बहुमत मिळाले आहे, असे सहजच दिसून येते.

(म्हणे) ‘आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे ! ’ – प्रियांका वाड्रा यांचा कार्यकर्त्यांना संदेश !

काँग्रेसला जनता नाकारत असल्यामुळे काही वर्षांत हा पक्ष इतिहासजमा होईल. हे लक्षात घेता अशा सल्ल्याचा काही उपयोग होणार नाही, हे वाड्रा यांनी लक्षात घ्यावे !

गोव्यात सत्तास्थापनेसाठी मगोप आणि अपक्ष यांना समवेत घेणार ! – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ते पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात मी नसतांनाही कामे झाली. भलेही थोड्याशा मतांनी विजयी झालो असलो, तरी माझ्या जिंकण्याचे संपूर्ण श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना, तसेच माझ्या पक्षाला जाते.

उत्तरप्रदेशमध्ये शिवसेनेला अपयश : एकही जागा जिंकता आली नाही !

शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्रातील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नेते संजय राऊत, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, तसेच अन्य नेते उत्तरप्रदेशात पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते.

५ पैकी ४ राज्यांत पुन्हा भाजपचीच सरशी !

५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल
पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसचा धुव्वा : आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत !

जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा ! – राहुल गांधी

५ राज्यांच्या निवडणुकांत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले की, जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा. जनादेश जिंकणार्‍यांना हार्दिक शुभेच्छा.

पंजाबमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू पराभूत !

नवज्योतसिंह सिद्धू यांनी पराभवानंतर ट्वीट करून म्हटले, ‘लोकांचा आवाज हा थेट देवाचा आवाज असतो. पंजाबच्या लोकांनी दिलेला कौल नम्रपणे स्वीकारतो. आम आदमी पक्षाचे अभिनंदन.’

मार्च २०२२ मध्ये नैसर्गिक आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता !

ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीवरून मार्च २०२२ या मासात देशात नैसर्गिक आणि राजकीय भूकंप होण्याची शक्यता ‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या घरावर आयकर विभागाकडून धाडी !

‘‘भाजपला महाविकास आघाडीची भीती वाटू लागली. तेव्हापासून या धाडी चालू आहेत. उत्तर प्रदेश, भाग्यनगर, बंगाल येथेही असेच करण्यात आले. आता महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत; म्हणून येथे त्यांच्या कारवाया चालू आहेत.’’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन मास पुढे ढकलल्या ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी घातलेल्या अटींची पूर्तता करण्यासाठी ३ मास लागणार आहेत. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.