४ राज्यांतील ४ विधानसभा आणि १ लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधकांना यश

तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा व बाबुल सुप्रियो

नवी देहली – बिहार, बंगाल, छत्तीसगड आणि महाराष्ट्र येथे झालेल्या ४ विधानसभा मतदारसंघांतील आणि १ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नाही.

महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचा उमेदवार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार विजयी झाला. बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा, तर बालीगंज विधानसभा मतदारसंघातून तृणमूलचेच बाबुल सुप्रियो विजयी झाले आहेत.