गोवा शासनाच्या मध्यप्रदेशमधील कोळसा भूखंडात घोटाळा झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोप बिनबुडाचा ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोना महामारीमुळे कोळसा भूखंड वाटप प्रक्रियेला विलंब झाला आहे.

दिवसभरात कोरोनाबाधित २०० नवीन रुग्ण गोव्यात रुग्णांच्या संख्येचा वाढता आलेख कायम

उत्तर गोव्यात समुद्रकिनार्‍यांवर मास्क न घालता फिरणार्‍या पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !

दाणोली येथील समर्थ साटम महाराज यांचा ८४ वा पुण्यतिथी सोहळा कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला.

केपे येथील व्यक्तीचा कोरोनाची लस घेतल्याने मृत्यू झालेला नाही ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

कोरोनाची लस घेतल्यानंतर ४८ घंट्यांच्या आत केपे येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेे.

सांगलीत कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

३० मार्च या दिवशी २ उपाहारगृहे आणि १ बेकरी यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणी ७५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला.

लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा, डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा अन्यथा मागील वर्षीसारखी स्थिती पुन्हा अनुभवावी लागेल !

४५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनी कोरोनाची लस घ्यावी. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. कोरोनाचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यास हळूहळू कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या उणावू लागेल.

नियम पाळा आणि दळणवळण बंदी टाळा ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लसीकरण वेगाने चालू असून ‘हर्ड इम्युनिटी’ आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातून रुग्णसंख्या न्यून होतांना दिसेल.

नाशिकमध्ये बाजारात खरेदीसाठी प्रतिघंटा आकारले जाणार ५ रुपये शुल्क !

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने एक आदेश काढला आहे. बाजारात खरेदीला जाण्यासाठी प्रतिघंटा ५ रुपये शुल्क महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे.

हिंदूंच्या मंदिरांसह अन्य धार्मिक स्थळांसाठीही कोरोना नियम बंधनकारक करावेत ! – विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निवेदनाद्वारे प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे हिंदूंच्या विविध सणांवर प्रशासनाकडून कायम निर्बंध लादण्यात येतात आणि सहिष्णु हिंदू त्यांचे पालनही करत आहेत; मात्र अन्य धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दिवसातून ५ वेळा शेकडो जण एकत्र येतात.

पत्रकारांनी कोरोना लस घेणे काळाची आवश्यकता ! – किशोर पाटील, कोकण विभागीय सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

ज्या पत्रकार बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तातडीने साहाय्य करावे.