मुरगाव, मडगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या ५ नगरपालिकांसाठी २३ एप्रिलला निवडणूक

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारी अर्ज प्रविष्ट करतांना प्रत्येक उमेदवारासमवेत केवळ २ व्यक्ती कार्यालयात प्रवेश करू शकतील.

सोलापूर येथे शासकीय रुग्णालयातून नागरिकाला कोरोना ‘पॉझिटिव्ह’ सांगितले, तर खासगी रुग्णालयातून ‘निगेटिव्ह’ अहवालाने संभ्रम !

यामध्ये कोण चुकले आहे, हे जनतेला समजले पाहिजे आणि संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

नांदेडमधील हिंसाचार !

धुळवडीला खरेतर एकमेकांना रंग लावून तो उत्सव आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो; मात्र याच दिवशी शिखांमधील काही समाजकंटकांनी होळीच्या रंगात नव्हे, तर रक्ताच्या लाल रंगात नांदेडच्या मातीला भिजवले !

आरोग्यविषयीची संसाधने वाढत्या रुग्णांपुढे न्यून पडल्यास दळणवळण बंदी करावी लागते ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारला याविषयी चिंता आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, ते सरकारकडून केले जात आहे. संसाधनांची कमतरता पडू दिली जाणार नाही.

वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यशासनाचा निर्णय !

डोंबिवली येथे नियमाचा भंग करणार्‍या १२५ आंदोलनकर्त्या व्यापार्‍यांवर गुन्हे नोंद

प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या तक्रारीवरून आंदोलनकर्त्या १२५ व्यापार्‍यांवर डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.

पुणे येथील ससून रुग्णालयात सर्वाधिक कोरोना मृत्यू का ? – केंद्रीय आरोग्य सचिवांचा प्रश्‍न

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे घेतलेल्या बैठकीला पुणे आणि मुंबई येथील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी अग्रवाल यांनी पुणे-मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या संसर्गाविषयी विचारणा केली.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी हा उपाय नाही ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

आता दळणवळण बंदी केली तर सरकार एक रुपयांचे पॅकज देणार नाही. मागील एक वर्षभर लोकं कसे जगले हे समजणे कठीण आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दळणवळण बंदीला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे.

अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा आतंकवाद्यांचे षड्यंत्र !

प्रतिवर्षी जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा धोका या यात्रेला असतोच. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट करण्याला पर्याय नाही !

उत्तर कन्नडा भागातील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या मंदिरांतील सर्व उत्सव रहित

कर्नाटक राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने त्या ठिकाणच्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.