अन्नरसांचा प्रकृतीवर उत्तम परिणाम होण्यासाठी नामजप करत जेवणे श्रेयस्कर !

अन्न हे पवित्र घरचे आणि पवित्र भावनेने केलेले अन् पवित्र धान्यांचे असावे. अन्नाप्रमाणे मन बनते. जेवतांना चालू असलेल्या विचारांचे संस्कार अन्नरसावर होतात आणि तेच पुढे आपल्या प्रकृतीतही रुजू लागतात.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुणी काही करण्याची आवश्यकता नाही;कारण कालमाहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

जो साधक ‘ईश्‍वरप्राप्ती’ हे ध्येय ठेवून प्रामाणिकपणे आपले कर्म करत रहातो, तो चुकला, तरी चालेल; गुरु त्या जिवाचा स्वीकार करतात आणि त्याला शिष्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात.

शोकांतिका !

‘पूर्वी लाच घेणारा शोधावा लागत असे. आता लाच न घेणारा शोधावा लागतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

परेच्छेने किंवा ईश्‍वरेच्छेने वागणे

परेच्छेने किंवा ईश्‍वरेच्छेने वागतांना आरंभी त्याचा त्रास झाला, तरी त्यातून साधना होते आणि पुढे त्यातून आनंदाची प्राप्ती होते.

व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग

सर्वांच्याच भूमिका एकसारख्या नसल्यामुळे त्या त्या भूमिकेच्या माणसांनाही मार्गदर्शन होण्यासाठी निरनिराळा उपाय सांगून ठेवावा लागतो, निरनिराळे; पण शास्त्रीयच आचार सांगावे लागतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ईश्‍वरी नियोजनानुसार योग्य वेळी मनुष्याला त्याच्या पाप-पुण्याचे फळ भोगायला मिळणे

वरकरणी जरी ‘भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही’, असे वाटत असले, तरी देवाच्या घरी उशीरही नाही आणि अंधारही नाही

स्वतःतील उणिवा दूर केल्यामुळे होणारा आत्मसूर्याचा साक्षात्कार !

जो दुसर्‍याच्या उणिवा काढण्यात चांगल्या प्रकारे निपुण असतो, तसाच जर तो स्वतःतील उणिवा समजून घेऊन त्या काढण्यात निपुण झाला, तर तो मुक्त का होणार नाही ? ‘दुसर्‍याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही’.