कुणीही आधारकार्ड क्रमांक, ‘एटीएमचा पिन’,‘ओटीपी’ यांसारखी गोपनीय माहिती मागितल्यास स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करा !

फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. दोषी सापडण्याचे अन् त्यांना दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे ‘Prevention is better than Cure’ यानुसार वेळीच सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

प्रतिवर्षी जानेवारी मासात सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि आवड यांनुसार गायन, नृत्य, नाट्य, एकांकिका आदी सादर करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणानुसार विविध पारितोषिके दिली जातात.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी ती मार्गदर्शक ठरेल.

सनातनची पत्रकारिता – सनातनच्या राष्ट्र अन् धर्म निष्ठ पत्रकारितेचा परिचय करून देणारा ग्रंथ !

सनातनच्या राष्ट्र अन् धर्म निष्ठ पत्रकारितेचा परिचय करून देणारा ग्रंथ !

‘सत्पात्रे दान’ म्हणजे ‘सतच्या कार्यासाठी दानधर्म’ करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही करून घ्या !

‘भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. ‘या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील पुढील सेवांमध्ये सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या धर्मप्रेमींचा आधारस्तंभ असणार्‍या ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील वरील सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात खारीचा वाटा उचला !

नोकरी किंवा व्यवसाय करताना आलेले चांगले किंवा कटू अनुभव कळवा !

समाजात नोकरी किंवा व्यवसाय करतांना आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये चांगले किंवा कटू अनुभव येत असतात. आपल्यालाही चांगले अथवा कटू अनुभव आले असतील, तर आम्हाला अवश्य कळवा. आपल्या अनुभवांतून इतरांना शिकण्याची संधी मिळेल.

कीर्तने आणि प्रवचने यांतून राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांची सद्य:स्थिती सांगून जनप्रबोधन करा !

कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, तसेच व्याख्याते यांना कीर्तनात मांडण्यासाठी वरील विषयांची विस्तृत माहिती हवी असल्यास समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी किंवा श्री. अरुण कुलकर्णी यांना ७७३८२३३३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा वा hindujagruti.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सनातनच्या आश्रमांमध्ये हात आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता !

‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे अनेक साधक रहातात. भारतभरातील सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्‍या साधकांसाठी हात धुण्याच्या आणि कपडे धुण्याच्या साबणांची आवश्यकता आहे.