कर्नाल (हरियाणा) येथे ‘राईस मिल’ची इमारत कोसळून ४ कामगारांचा मृत्यू

येथे ‘शिवशक्ती राईस मिल’ची इमारत कोसळून त्यात २० ते २५ कामगार गाडले गेले आहेत. आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

पाटलीपुत्र (बिहार) येथे वाळू माफियांकडून सरकारी अधिकार्‍यांवर आक्रमण !

बिहारची पुन्हा एकदा जंगलराजच्या दिशेने वाटचाल चालू असल्याचे हे निर्देशक आहे ! ही स्थिती तेथील सरकार आणि पोलीस यांना लज्जास्पद !

अमरनाथ यात्रेच्या नोंदणीला प्रारंभ

अमरनाथ यात्रेसाठी १७ एप्रिलपासून नोंदणीस प्रारंभ झाला आहे. १३ ते ७० या वयोगटातील लोक नोंदणी करू शकतात.

बांगलादेशाची विचार स्वातंत्र्याविषयीची भूमिका भयावह ! – तस्लिमा नसरीन

एका महाविद्यालयाच्या प्राचार्या सेलिना अख्तर यांनी ‘रमझान हा शब्द मला रामाची आठवण करून देतो’, असे म्हटल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले.

ज्ञानवापीशी संबंधित सर्व ७ प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार

ज्ञानवापी आणि शृंंगार गौरी प्रकरणातील ७ याचिकांवर एकत्र सुनावणी करण्याचा न्यायालयाचा आदेश ! शृंगार गौरीच्या प्रकरणी वादी असणार्‍या लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांनी अर्ज करून ही मागणी केली होती.

उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

जे माफिया आधी राज्यासाठी संकट होते, आता ते स्वतः संकटात आहेत. आमच्या काळात उत्तरप्रदेशात एकदाही संचारबंदी लागलेली नाही. कोणत्याही रस्त्यावरून जायला आता भीती वाटत नाही. उत्तरप्रदेश आता विकासासाठी ओळखला जातो.

सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत समावेश !

यापूर्वी वर्ष २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये मूल्यांकन झाले. वर्ष २०२२ मध्ये झालेल्या मूल्यांकनानुसार पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर तमिळनाडूमध्ये रा.स्व. संघाकडून ४५ ठिकाणी काढण्यात आल्या फेर्‍या !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून १६ एप्रिल या दिवशी राज्यातील ४५ ठिकाणी भव्य फेर्‍या काढण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन सरकारकडून या फेर्‍यांवर बंदी घालण्यात आली होती.

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १३ जणांचा मृत्यू !

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केल्याचा सोहळा संपल्यानंतर अनेक श्री सदस्यांना (संप्रदायातील सदस्यांना) उष्माघाताचा त्रास झाला.

चेहर्‍यावर भारताचा राष्ट्रध्वज रंगवल्याने युवतीला पंजाबमधील सुवर्ण मंदिरात प्रवेश नाकारला

पंजाबमध्ये फुटीरतावाद कोणत्या स्तरापर्यंत पोचला आहे, हे यावरून लक्षात येते. केंद्र सरकारने वेळीच अशा सर्व फुटीरतावादी तत्त्वांवर कठोर कारवाई केली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीच शक्यता अधिक आहे !