सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या संशोधनावरील शोधनिबंध डिसेंबर २०२३ मध्ये वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर

ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९२ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११२ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’च्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

साधना करून वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून करा ! – राज कर्वे, ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

व्यक्तीमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यास तिच्याकडून अयोग्य आचरण होऊन वास्तूत नकारात्मक स्पंदने निर्माण होतात.

यज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करण्यासाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे आणि साधना करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क

यज्ञाचा परिणाम यज्ञस्थळापासून सहस्रो किलोमीटर दूर असलेल्या भागांवरही होतो, हे यज्ञस्थळापासून विविध अंतरांवर असलेल्या ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत आढळले.

अन्न ग्रहण करतांना चमच्याचा वापर करण्याऐवजी ते हाताने ग्रहण करणे श्रेयस्कर ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन

‘अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. आपण कोणते आणि कशा प्रकारे अन्न ग्रहण करतो ? याचा आपले शरीर, मन आणि बुद्धी यांच्यावर परिणाम होतो. हिंदु धर्मात अन्न ग्रहण करण्याला ‘यज्ञकर्म’ मानले आहे. यज्ञ करतांना ज्या प्रकारे हाताने आहुती दिली जाते, त्याच प्रकारे अन्न ग्रहण करतांना ते हाताने ग्रहण करण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे; परंतु सध्याच्या … Read more

Diwali : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्‍या भावपूर्ण पूजनामुळे श्री लक्ष्मीपूजनाच्‍या घटकांतील सकारात्‍मक ऊर्जा (चैतन्‍य) विलक्षण वाढणे

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने लक्ष्मीपूजनाच्‍या मांडणीतील सर्व घटकांची पूजनापूर्वी आणि पूजनानंतर चाचण्‍या करण्‍यात आल्‍या. त्‍यांची निरीक्षणे आणि काढलेले निष्कर्ष देत आहोत.

देवपूजेसाठी लागणार्‍या वातींच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले संशोधन !

स्त्रियांनी घरी हाताने बनवलेल्या वाती, बाजारात तयार मिळणार्‍या वाती, तसेच सनातन-निर्मित सात्त्विक वाती यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

‘दसर्‍याच्या दिवशी आपट्याच्या पानांवर होणारा सकारात्मक परिणाम’ याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘आपट्याच्या पानावर दसर्‍याच्या दिवशी काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित २ शोधनिबंध सप्टेंबर २०२३ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

वरील पहिल्या शोधनिबंधाचे सहलेखक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे मुख्य सदस्य) आणि दुसर्‍या शोधनिबंधाच्या सहलेखिका सौ. श्वेता क्लार्क आहेत.

कुमारिका पूजनाचा पूजक आणि कुमारिका यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे

‘कुमारिका पूजनाचा पूजक आणि कुमारिका यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाच्या साहाय्याने अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीचे विवरण पुढे दिले आहे.