बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट कधी लावणार ?

बंगालच्‍या मारग्राम येथे झालेल्‍या बाँबस्‍फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता न्‍यूटन शेख हा ठार झाला आहे, तसेच तृणमूलच्‍याच पक्षाचा पंचायत प्रमुखाचा भाऊ लाल्‍टू शेख हा घायाळ झाला आहे.

मंदिरांचे पावित्र्य कोण राखणार ?

महाराष्‍ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार धार्मिक स्‍थळापासून  ७५ मीटरच्‍या आत मद्यालये उभारण्‍यावर बंदी असल्‍याने त्‍यापुढे मद्यालये उभारण्‍यात आल्‍याने काही जागृत मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्‍याभोवती मद्यालयांचा विळखा पडला आहे.

असे मदरसे आता बंदच व्‍हायला हवेत !

उत्तरप्रदेशातील संपला बक्‍कल गावातील रहिमिया मदरशात शिकणार्‍या एका १३ वर्षीय मुलावर त्‍याच मदरशात शिकणार्‍या मुलाने लैंगिक अत्‍याचार केले आणि नंतर त्‍याची हत्‍या केली.

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी असे करतात ?

कॅनडातील ब्रॅम्‍पटन शहरात हिंदूंच्‍या गौरीशंकर मंदिराच्‍या तोडफोडीचे सूत्र भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडाच्‍या संसदेत उपस्‍थित केले. त्‍यांनी कॅनडा सरकारकडे अशा घटना रोखण्‍यासाठी प्रयत्न करण्‍याची मागणी केली.

पाकला झालेली दिखाऊ उपरती !

‘आपणच आतंकवादाची बीजे पेरली आहेत’, अशी स्‍वीकृती पाकचे संरक्षणमंत्री ख्‍वाजा आसिफ यांनी संसदेत दिली. पेशावर येथील मशिदीत झालेल्‍या बाँबस्‍फोटावरून ते बोलत होते.

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

ब्रॅम्‍पटन (कॅनडा) येथील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड करून मंदिराच्‍या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्‍यात आल्‍याची घटना घडली आहे.

समाजवादी पक्षाचा हिंदुद्वेष जाणा !

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीच्या समर्थनार्थ उत्तरप्रदेशमध्ये ‘श्रीरामचरितमानस’च्या काही प्रती जाळण्यात आल्या. या प्रकरणी १ मुसलमान आणि ४ ओबीसी यांना अटक करण्यात आली आहे.

बिहारमध्ये हिंदू असुरक्षित !

बिहारच्या बसडीला गावामध्ये २७ जानेवारीला धर्मांध मुसलमानांनी मशिदीजवळ अंकित कुमार या तरुणाची क्रिकेटच्या वादावरून हत्या केली. या वेळी त्याचे ३ मित्र घायाळ झाले.

मशिदींवरील भोंग्यांचा आवाज कधी न्यून होणार ?

मध्यप्रदेशातील दिवेल गावामध्ये हनुमान मंदिरावरील भोंग्याचा आवाज न्यून करण्यास नकार दिल्यानंतर मुसलमानांनी मंदिराच्या पुजार्‍याला घरात घुसून मारहाण केली. पुजार्‍यांनी मशिदींवरील भोंग्यांचा आवाज आधी न्यून करण्याची मागणी केली होती.

हिंदूंनो, हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करा !

‘हिंदु राष्‍ट्र बनवणारे किती आले आणि किती गेले. आमच्‍या देशाला हिंदु राष्‍ट्र बनवले जाऊ शकत नाही’, असे विधान बरेली (उत्तरप्रदेश) येथील मौलाना तौकीर रझा यांनी धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांच्‍या हिंदु राष्‍ट्र बनवण्‍याच्‍या विधानावर केले.