‘ग्लोबल वॉर्मिंग’ कुणामुळे ?

‘ग्लोबल वॉर्मिंग’ (जागतिक तापमानवाढ) न्यून करण्यासाठी शास्त्रज्ञ पृथ्वीच्या बाहेरील वातावरणाच्या वरच्या भागात फुग्यांद्वारे सल्फर डायऑक्साईड सोडणार आहेत. त्यामुळे पृथ्वीवर येणार्‍या सूर्यकिरणांना पृथ्वीच्या बाहेरच परावर्तित करता येईल आणि त्याची उष्णता पृथ्वीपर्यंत अल्प प्रमाणात पोचेल.

आदर्श शिक्षापद्धत हवी !

गुन्हेगार मोकाट, तर सामान्य जनता जीव मुठीत धरून जगत आहे. हेच दृश्य सर्वत्र बघायला मिळत आहे. हे दृश्य पालटण्यासाठी छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !

कृषी अभियंत्‍यांची हेळसांड !

कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्‍यांच्‍या भवितव्‍यासाठी आणि पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्‍यासाठी महाराष्‍ट्र सरकारने सर्वसमावेशक विचार करून योग्‍य निर्णय घ्‍यावे, असे वाटते. जेणेकरून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्‍यांची हेळसांड थांबेल, हे निश्‍चित !

शौर्याची परंपरा !

वेदांशीप्रमाणे मुलींवर लहानणापासूनच शौर्याचे संस्‍कार असतील, तर ती कुणाही आफताब पूनावाला किंवा इक्‍बालच्‍या षड्‌यंत्राला बळी पडणार नाही आणि पुढची पिढी नक्‍कीच राष्‍ट्र-धर्मप्रेमी होईल !

थकित शुल्‍क परतावा मिळावा !

योजना कोणतीही असो, ती योग्‍य पद्धतीने चालू हवी. सरकार ज्‍यांच्‍यासाठी योजना काढते त्‍यांच्‍यापर्यंत त्‍या सुविधा पोचत नाहीत. सरकारने इच्‍छाशक्‍ती वाढवून योजना लाभार्थींपर्यंत पोचण्‍यातील अडथळे दूर करावेत, हीच अपेक्षा !

अकार्यक्षम अग्‍नीशमन यंत्रणा !

जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा येथे एका घराच्‍या दुसर्‍या माळ्‍याला शॉर्ट सर्किटमुळे मध्‍यरात्री १.३० वाजता आग लागली होती. चोपडा पालिकेचे दोन अग्‍नीशमन दलाचे बंब घटनास्‍थळी पोचले; मात्र दोन्‍ही बंबांचे पाईप फाटलेले होते, व्‍हॉल्‍व्‍ह नादुरुस्‍त, कर्मचारी अप्रशिक्षित, कर्मचार्‍यांकडे संरक्षित उपकरणे नव्‍हती.

सायकल वापरूया !

आजच्या झगमगत्या युगात सायकलचा उपयोग केला, तर लोक काय म्हणतील ? याचा प्रथम विचार होतो. याला शुद्ध मूर्खपणा म्हणता येईल. प्रवाहाच्या विरुद्ध न जाता अयोग्य गोष्टींच्या प्रवाहासह वहात जाण्यास शहाणपणा समजला जातो.

शेतकर्‍यांचे आंदोलन ?

जनतेच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून घेऊन त्यांचे समाधान करणे, हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या कशा सोडवाव्यात आणि जनतेची मानसिकता आत्मदहन करण्याची होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, असेच शेतकर्‍यांना वाटते !

रासायनिक ताडीच्‍या विक्रीवर बंदी हवीच !

सोलापूर जिल्‍ह्यात ३२ सहस्र झाडांची नोंद असलेली संख्‍या पुढील ४ वर्षांत ३८ सहस्र झाली. केवळ ४ वर्षांत ६ सहस्र ताडी उत्‍पादनक्षम झाडे कुठून आणि कशी वाढली ? त्‍यामुळे प्रशासन जिल्‍ह्यात ३८ सहस्र ताडीची झाडे असल्‍याचे भासवत असून नागरिकांच्‍या जीवाशी खेळण्‍याचाच हा प्रकार आहे.

वृद्धाश्रम : हिंदु संस्कृतीवरील कलंक !

आई-वडिलांनाच ईश्वर मानून त्यांची सेवा करणार्‍या श्रावण बाळाची आपली संस्कृती असतांना सरकारला ‘श्रावण बाळ योजना’ आणावी लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. आपले आई-वडील मुलांना जड व्हावेत इतकी वाईट वृत्ती समाजात वाढली आहे, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.