गोवा : मोरजी आणि मांद्रे समुद्रकिनार्‍यांवर संगीत महोत्सव घेण्यास बंदी येणार

मोरजी ते मांद्रे ही समुद्रकिनारपट्टी कासव संवर्धन केंद्र म्हणून घोषित केल्यामुळे या क्षेत्रात यापुढे संगीत महोत्सव आयोजित करण्यास मनाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली आहे.

कोरोना महामारीनंतर लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये वाढ !

मुलांच्या समस्या पाहिल्यास त्यांच्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे आवश्यक वाटते ! त्यामुळे सरकारने मानसिक स्तरावरील उपायांसमवेत मुलांवर साधनेचे संस्कार होतील असे पहावे.

देशाची फाळणी रोखण्याची क्षमता असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ! – डॉ. उदय निरगुडकर

वर्ष १८३७ पासून अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, तिबेट, बर्मा (म्यानमार) आणि वर्ष १९४८ ला श्रीलंका भारतातून फुटून बाहेर पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या सूचना वेळोवेळी कार्यवाहीत आणल्या असत्या, तर कदाचित भारत एकसंध राहिला असता.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात काम पहाणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करा ! – रायबाग आणि बेळगाव येथे निवेदन

गौरी लंकेश प्रकरणात काम पहाणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या आक्रमणकर्त्यांना तात्काळ अटक करा, तसेच अधिवक्ता कृष्णमूर्ती यांना सशस्त्र पोलीस संरक्षण द्या, या मागण्यांसाठी…

अर्थसंकल्पात घोषणा; मात्र अद्याप ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या निधीत वाढ नाही !

अर्थसंकल्पीय अधिवेशनात ९ मार्च या दिवशी विधीमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्यात आली असल्याची घोषणा केली

आक्षेपार्ह लिखाणाप्रकरणी हिंगोली पोलिसांकडून १४८ जणांना नोटिसा !

भडक, जातीय तेढ निर्माण करणार्‍या, शांतता भंग करणार्‍या ‘पोस्ट’वर लक्ष ठेवण्यात येत आहे. आक्षेपार्ह छायाचित्र किंवा व्हिडिओ पुढे पाठवणे, ते प्रसारित करणे, आवडल्याचे सांगणे यांवर त्वरित माहिती काढून संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येत आहे.

कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथे शंभु महादेव कावड यात्रा उत्साहात पार पडली !

शिखर शिंगणापूर येथे शंभु महादेवाचे मंदिर बांधणार्‍या राजा सिंघणदेव यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव (तालुका दक्षिण सोलापूर) येथे शिंगणापूरसारखीच रचना असणारे मंदिर बांधण्यात आले.

गडदुर्गांवरील पर्यटनापेक्षा त्यांचे जतन- संवर्धन अधिक महत्त्वाचे ! – छत्रपती संभाजीराजे

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानंतरही राज्यातील गडदुर्गांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. सर्व राजकीय पुढारी केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गडदुर्ग यांची नावे घेतात; मात्र प्रत्यक्षात त्यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी कुणीच काही प्रयत्न करत नाही.

पुणे येथील भंगारात निघणार्‍या जुन्या सरकारी वाहनांची संख्या ६० टक्क्यांनी अल्प !

या वाहनांचा आकडा अनुमाने २ सहस्र होता; परंतु प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर हा आकडा ६० टक्क्यांनी न्यून होऊन केवळ ८५६ वाहनेच भंगारामध्ये काढली जातील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आर्.टी.ओ.) सूत्रांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत समावेश !

यापूर्वी वर्ष २०१०, २०१४, २०१८ आणि २०२२ मध्ये मूल्यांकन झाले. वर्ष २०२२ मध्ये झालेल्या मूल्यांकनानुसार पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ‘पुष्कळ चांगले’ (व्हेरी गुड) श्रेणीत आले आहे.