पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. २ वर्षांनंतर होणार्या लोकसभा निवडणुकीसाठीची सिद्धता भाजपने चालू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या ३ दिवसांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यावर येत आहेत. त्यातील २२ कार्यक्रमांपैकी इंदापूर येथील युवक आणि नवीन मतदारांशी अखेरच्या दिवशी होणार्या सितारामन् यांच्या संवादाचे दायित्व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे पक्षाने सोपवले आहे. निर्मला सीतारामन् यांच्यानंतर केंद्र आणि राज्यातील अनेक वरिष्ठ नेते बारामती दौर्यावर येणार आहेत.