सोलापूर येथील व्‍यापार्‍याची ५० लाख रुपयांची फसवणूक !

२ धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – येथील शेळगी परिसरातील एका व्‍यापार्‍याची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी एम्. मुस्‍तफा आणि अली जिन्‍ना (राजा) यांच्‍याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. श्री. सिद्धाराम बावकर यांचा कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, सोलापूर येथे शेतमाल खरेदी-विक्री करण्‍याचा व्‍यवसाय आहे. आरोपींनी वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत सुरळीत व्‍यापार करून व्‍यावसायिकांचा विश्‍वास संपादन केला. या विश्‍वासावर सिद्धाराम बावकर यांनी ४९ लाख ६८ सहस्र ६३९ रुपये इतक्‍या रकमेचा शेतमाल विश्‍वासाने विक्रीसाठी तमिळनाडू येथे पाठवला; मात्र मालाच्‍या पैशांची मागणी केली असता त्‍यांनी व्‍यापार्‍याला धमकावत पैसे देण्‍यास नकार दिला. साहाय्‍यक पोलीस निरीक्षक सोनवणे या प्रकरणाचे पुढील अन्‍वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

उद्दाम धर्मांधांची मानसिकता लक्षात आणणारी घटना ! अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे आवश्‍यक !