सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण

जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण आढळले असून एकूण ४ सहस्र ८३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १४४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या साधिका निलावती शेलार यांचे सासरे हणमंता शेलार (वय ८० वर्षे) यांचे ९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

प्रशासनाच्या विरोधात साईप्रसाद कल्याणकर यांचे लाक्षणिक उपोषण

तालुक्यातील बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या ३२ एकरातील बांधकामासाठी बिनशेतीची अनुमती घेतली नसतांना ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, नगर रचनाकार सिंधुदुर्ग यांच्याकडून हे अवैध बांधकाम होत असतांना कानाडोळा केला जात आहे.

वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजपाचे कणकवली येथे आंदोलन

वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून महावितरण आणि राज्यसरकार यांचा निषेध केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाच्या नोटीसीला २१ दिवसात उत्तर द्यावे लागेल !

गेल्या १० वर्षांत तुमचे उत्पन्न कसे वाढले ?, निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली माहिती योग्य आहे का ?, याची विचारणा आयकर विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.

इन्सुली ग्रामस्थांचे मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यात बसून खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन !

अनुमाने २ घंटे केलेल्या या आंदोलनामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाली. त्यानंतर महामार्ग विभागाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी ‘८ दिवसांत खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करतो’, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर इन्सुली ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. (

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत योग्य आणि आवश्यक ते पालट करण्याचे निर्मात्यांसह वाहिनीच्या अधिकार्‍यांचे आश्‍वासन !

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत योग्य आणि आवश्यक ते पालट करण्यात येतील, यांविषयी ग्रामस्थांशी चर्चा करू, असे आश्‍वासन मालिकेचे निर्माता महेश कोठारे, लेखक विठ्ठल ठोंबरे, ‘स्टार प्रवाह’चे अधिकारी यांनी दिले.

मर्यादित संख्येतील वारकर्‍यांच्या उपस्थितीत कार्तिक वारीला अनुमती

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला होणारी पंढरपूर कार्तिकी वारी आणि ११ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडावी, याविषयी शासन सकारात्मक निर्णय घेईल.

शनिवारवाडा पर्यटकांसाठी तातडीने चालू करावा ! – ब्राह्मण महासंघाची मागणी

‘अनलॉक’ नंतर सर्व धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळे उघडण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेही ऐतिहासिक स्थळे उघडण्यास अनुमती दिली आहे; मात्र शनिवार वाडा पर्यटकांसाठी अजूनही बंद आहे.

विनामास्क फिरणार्‍यांवर मालवण नगरपरिषदेची कारवाई

मालवण नगर परिषदेकडून  शहरात कोरोनाविषयक नियमांची काटेकोर कार्यवाही करतांना गेले काही मास विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढल्याने पालिकेने केलेल्या कारवाईत मागील  १० दिवसांत १० सहस्र रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.