२२ वर्षे विविध मशिदींमध्ये चोरी करणाऱ्या हुसेन याला अटक

मुंबई – मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांतील मशिदींमधून रोख रक्कम अन् मौल्यवान वस्तू चोरणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. हुसेन आसिफ साजिद हुसेन सय्यद असे त्याचे नाव आहे. सय्यद हा कल्याण येथे रहातो. त्याने चेंबूर, धारावी, विक्रोळी, घाटकोपर, पनवेल, खोपोली आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या सीमेतील अनेक मशिदींमध्ये चोरी केली आहे. ज्या मशिदींमध्ये चोरी झाली होती, त्या मशिदींच्या शेजारील सीसीटीव्ही कॅमेरे पडताळणी केल्यानंतर सय्यद याच्यावर संशय बळावला. तो अनेक मासांपासून पोलिसांना गुंगारा देऊन पसार होत होता. अंततः त्याला अटक करण्यात आल्यावर तो वर्ष १९९९ पासून मशिदींमध्ये चोऱ्या करत असल्याचे उघड झाले. (२२ वर्षे चोरी करणाऱ्याला अटक करू न शकणे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)