अमरावती सत्र न्यायालयाचा निकाल !

अमरावती – माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी वर्ष २००५ मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करतांना पोलिसांसमवेत वाद घातला होता. ४ जुलै या दिवशी या प्रकरणी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे (क्रमांक १) न्यायाधीश एस्.एस्. अडकर यांनी विविध कलमांन्वये कडू यांना दोषी ठरवून २० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख ५ ऑगस्ट २००५ या दिवशी जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. बैठकीच्या वेळेत आमदार कडू यांनी तापी नदी प्रकल्पासंदर्भात ‘मडके फोडा’ आंदोलन केले होते. या वेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी