
नवी देहली – ४५ वर्षीय नितीन नबीन यांनी २० जानेवारीला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची औपचारिकपणे सूत्रे स्वीकारली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उपस्थितीत होते. पदभार स्वीकारण्यापूर्वी नबीन यांनी देहलीतील झंडेवालन मंदिर, वाल्मीकि मंदिर आणि कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. त्यांनी गुरुद्वारा बांगला साहिबचेही दर्शन घेतले.
कोण आहेत नितीन नबीन ?
नितीन नबीन यांचा जन्म बिहारची राजधानी पाटलीपुत्र येथे झाला. त्यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बांकीपूरचे माजी आमदार होते. वर्ष २००६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर नितीन नबीन यांनी बांकीपूर येथून पोटनिवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. वर्ष २०२५ पर्यंत ते ५ वेळ येथून आमदार म्हणून निवडून आले. सध्या ते बिहार सरकारमध्ये बांधकाममंत्री आहेत. वर्ष २०२१ ते २०२२ या काळातही ते बांधकाममंत्री होते. त्यांनी यापूर्वी भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले होते.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे