
नवी देहली – इस्रायल आणि हमास यांमधील संघर्ष कायमचा थांबण्यासाठी आणि गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता स्थापित करण्यासाठी अमेरिकेकडून ‘गाझा बोर्ड ऑफ पीस’ची स्थापना करण्यात आली आहे. या गाझा शांती मंडळात सहभागी होण्यासाठी अमेरिकेने भारताला अधिकृत निमंत्रण पाठवले आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
Honored to convey @POTUS invitation to Prime Minister @narendramodi to participate in the Board of Peace which will bring lasting peace to Gaza. The Board will support effective governance to achieve stability and prosperity! pic.twitter.com/HikLnXFFMp
— Ambassador Sergio Gor (@USAmbIndia) January 18, 2026
‘व्हाईट हाऊस’कडून भारताला या संदर्भात पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले की, मध्य-पूर्वेतील शांतता भक्कम करण्यासाठी आणि जागतिक संघर्ष सोडवण्यासाठी एक नवीन दृष्टीकोन स्वीकारण्यासाठी भारताचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला (नरेंद्र मोदी यांना) आमच्यासमवेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करणे, हा आमचा मोठा सन्मान आहे. २९ सप्टेंबर २०२५ या दिवशी गाझा संघर्ष संपवण्यासाठी एक व्यापक योजना घोषित करण्यात आली होती. ही योजना २० कलमी होती. या योजनेला पुढे घेऊन जाण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मान्यता दिली. आता ही सर्व स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. या योजनेच्या केंद्रस्थानी शांती मंडळ असून जे आतापर्यंतचं सर्वांत प्रभावी आणि परिणामकारक मंडळ आहे. जे एक नवीन आंतरराष्ट्रीय संघटना आणि संक्रमणकालीन प्रशासन म्हणून स्थापित केले जाईल.
संपादकीय भूमिका
|
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत