महाराष्ट्रात कुणाला पाठिंबा द्यायचा ?, हे आमचा पक्ष ठरवणार ! – Asaduddin Owaisi

‘भाजपला पाठिंबा देणार का ?’ या प्रश्नावर ओवैसी यांचे उत्तर !

असदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये कोणत्या पक्षाला समर्थन द्यायचे किंवा नाही ? याचा निर्णय पक्षस्तरावर होईल. कुठल्याही नगरसेवकाला स्वत:हून असा निर्णय घेता येणार नाही. कुठलाही नगरसेवक पक्षाचे धोरण सोडून असा निर्णय घेत असेल, तर त्याच्यावर कारवाई होईल. कुणी आमच्या पक्षाला तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे पुढे काय करायचे ?, हे पक्ष स्वत: ठरवेल. कुणाच्याही दबावाखाली निर्णय होणार नाही. पक्षाला फोडण्याचा प्रयत्न झाला, तर जनता त्यांना धडा शिकवेल, अशी चेतावणी ए.आय.एम्.आय.एम्. पक्षाचे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेत ए.आय.एम्.आय.एम्.चे ८ नगरसेवक, छत्रपती संभाजीनगर येथे ३३, तर संपूर्ण राज्यात एकूण १२५ नगरसेवक निवडून आले आहेत.