१० हून अधिक पोलीस घायाळ

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील पुराणापूल दरवाजाजवळ १४ जानेवारीच्या उशिरा रात्री अज्ञात व्यक्तींनी एका मंदिरात तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तोडफोडीची बातमी पसरताच स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आणि घटनास्थळी मोठी गर्दी जमली. संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली. अनेक वाहनांना आग लावण्यात आली. या हिंसाचारात १० पेक्षा अधिक पोलीस घायाळ झाले. पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. माहिती मिळताच खासदार असदुद्दीन ओवैसीही घटनास्थळी पोचले.
Temple Desecration Sparks Unrest in Bhagyanagar
Violence broke out in Bhagyanagar (Hyderabad), Telangana after a temple was desecrated by an unidentified person.
🚨 Over 10 police personnel injured as tensions escalated.
A grim reminder: Hindu temples remain unsafe in states… pic.twitter.com/i1Ft1dG7Gr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 15, 2026
जमावाकडून कबरीची तोडफोड
पोलिसांच्या माहितीनुसार मंदिरातील तोडफोडीमुळे संतप्त जमावाने घोषणाबाजी केली आणि तणाव वाढला. त्यानंतर जवळच्या अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळावर आक्रमण करण्यात आले, तसेच तेथील कबरीची तोडफोड करण्यात आली. धार्मिक ध्वजाचीही हानी करण्यात आली. या वेळी दोन्ही बाजूंचा जमाव समोरासमोर आला. या वेळी वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
सध्या कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुराणापूल आणि आजूबाजूच्या भागात पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त ठेवरण्यात आला. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी १५ जानेवारीला सकाळी परिसराला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
भाजपाची काँग्रेस सरकारवर टीका
तेलंगाणा भाजपने एक्स खात्यावर मंदिराचा व्हिडिओ प्रसारित करून राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका केली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यांत हिंदूंची मंदिरे असुरक्षित असतात, हे लक्षात घ्या ! |
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी