
मुंबई – १३ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर १४ जानेवारी या दिवशी मतदारांना घरी जाऊन भेटू शकतो, असे नवीन परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे. मतदारांना भेटतांना पत्रकांचे वाटप करता येणार नाही, असे आयोगाने म्हटले आहे. कदाचित पैशांचे वाटप करता येईल, असे निवडणूक आयोगाला सांगायचे आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही सवलत का देण्यात आली नव्हती आणि आता का देण्यात आली आहे ? अशा प्रकारे नियम का आणले जात आहेत ? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ‘पाडू’ यंत्राचा उपयोग करण्याविषयी राजकीय पक्षांना आधी का सांगण्यात आले नाही ? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
एस्.टी.च्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परिवहनमंत्र्यांकडून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ !
कंत्राटदाराला ५ लाख रुपये, तर सल्लागार संस्थेला २ लाख रुपयांचा दंड !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !