
पुणे – येथे सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी मंदिर परिसरात बेघर लोकांनी पदपथावर अतिक्रमण करून तात्पुरत्या निवार्याची व्यवस्था केली आहे. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. भाविकांच्या मागे लागून बेघर लोक पैसे (भीक) मागतात. ते पदपथावर झोपत असल्ययाने व्यावसायिक आणि व्यायाम करणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. अस्वच्छ अंथरूण-पांघरूण टाकणे, शिळे अन्न आणि कचरा टाकणे यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यांतील एक महिला नागरिकांवर दमदाटी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हे लोक तेथेच शेकोट्या पेटवत असल्याने वायूप्रदूषणात वाढ होत आहे. ‘पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी यावर कायमस्वरूपी उपाय करावा’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलीस कारवाई करतात; पण काही काळाने हे लोक पुन्हा त्याच ठिकाणी येतात. ‘पोलिसांनी मंदिर व्यवस्थापन समितीशी चर्चा करून पूर्णवेळ सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी’, अशी माहिती आरोग्य विभाग महापालिकेचे मुकादम राजेंद्र नेवासे यांनी दिली.
संपादकीय भूमिकामंदिराची स्वच्छता आणि संरक्षण करण्यात मंदिर व्यवस्थापन समिती पुढाकार घेऊन कृती का करत नाही ? पोलीस आणि महापालिका बेघर लोकांचे योग्य पुनर्वसन का करत नाहीत ? |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !