‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, अशी स्थिती असण्यापेक्षा ‘तुम्ही राजा व्हा, तुम्ही कारभार करा !’, अशी स्थिती निर्माण होणे आवश्यक !

‘वेदांमध्ये म्हटले आहे, ‘हे इंद्रा, तू सर्वार्थांनी लायक आहेस. तू राजा हो.’ असे लोकांनी राजासाठी म्हणायला पाहिजे; परंतु भारतात मात्र ‘मी राजा होतो, मला निवडून द्या’, असे शब्द ऐकू येतात.’
खरे सामर्थ्य !
१. ‘भौतिक सुखाने तुमची चैतन्य शक्ती, सामर्थ्य वाढत नाही, उलट तुम्ही निर्बल, दुर्बल होता. यासाठी साधना करून आत्मशक्ती (चैतन्य शक्ती) वाढवणे आवश्यक आहे.
२. साधनेला महागाईची अडचण नसते. साधनेला कशाची आवश्यकता नसते. कुठेही बसून साधना करता येते.
३. आत्म्यावरील आवरण काढून आत्मशक्ती निर्माण झाली की, ‘तो जीव कोणतेही कार्य सहज सुलभ रितीने करू शकतो.’ जिवाची इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती मिळून जेव्हा कार्य होते, तेव्हा ते कार्य चैतन्याद्वारे सुलभ रितीने पार पडते.’
‘साधक हा सैनिक, म्हणजे क्षात्रसैनिक असला पाहिजे. तो क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी युक्त हवा. इथे सैन्यसंख्येचा प्रश्न नाही.’
– परात्पर गुरु पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.४.२०१५)
सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !