जींद ते सोनीपत मार्गावर धावणार अनेक सुविधांनी सज्ज असलेली ही रेल्वेगाडी !

सोनीपत (हरियाणा) : हायड्रोजनवर चालणारी देशातील पहिली रेल्वेगाडी हरियाणातील जींद ते सोनीपत या मार्गावर धावण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. या उपक्रमामुळे भारतीय रेल्वे हरित ऊर्जेच्या दिशेने एक नवा अध्याय लिहिणार आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी प्रसिद्ध केलेला व्हिडिओ |
या रेल्वेची झलक हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी त्यांच्या सामाजिक माध्यमावरील खात्यावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओतून दाखवली आहे. या व्हिडिओत त्यांनी हायड्रोजन रेल्वे हरियाणाचा अभिमान असल्याचे नमूद करत तिचे लवकरच नियमित धावणे प्रारंभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आवाजविरहित आणि प्रदूषणमुक्त प्रवास
या रेल्वेचे वैशिष्ट्ये म्हणजे ती पूर्णत: शांतपणे धावणार असून त्यामुळे ध्वनीप्रदूषण जवळजवळ शून्य रहाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही रेल्वे एका फेरीत अनुमाने २ सहस्र ६०० प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता ठेवते. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार नियमित सेवेत आणण्यापूर्वी तिची अंतिम चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या वेळी तांत्रिक गोष्टी, सुरक्षिततेचे निकष आणि वेग यांची सखोल तपासणी केली जाईल. गुरुग्राम येथील प्रयोगशाळेत वायूची गुणवत्ता तपासली जात आहे. सर्व चाचण्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष धावण्याची चाचणी होणार आहे. सध्या तिचा निश्चित दिनांक ठरलेला नाही.
🚆 Bharat’s Hydrogen train – 1200 HP capacity. Developed by our engineers, our talent. |
हायड्रोजन रेल्वे असलेला भारत ठरणार जगातील सहावा देश !
![]() हायड्रोजन रेल्वे असलेला भारत लवकरच सहावा देश ठरणार आहे. या क्षेत्रात सर्वांत आधी जर्मनीने वर्ष २०१८ मध्ये हायड्रोजनवर चालणारी रेल्वेगाडी चालू केली. त्यानंतर चीन (वर्ष २०२२), जपान (वर्ष २०२२), कॅनडा (वर्ष २०२३), अमेरिका (वर्ष २०२५) यांनी या तंत्रज्ञानाचा विकास करून हायड्रोजन रेल्वेगाड्या चालू केल्या. |
वेग आणि कार्यक्षमता
हायड्रोजन रेल्वे प्रतिघंटा ११० ते १४० किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. त्यामुळे ही रेल्वे पर्यावरणपूरक असण्यासमवेतच वेळेचीही मोठी बचत करणारी ठरणार आहे. आगामी काळात देशातील विविध भागांमध्ये हायड्रोजन रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे सरकार आणि रेल्वे प्रशासन यांचे उद्दिष्ट आहे.

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न