विशेष भक्तीसत्संग शृंखला : गुरुकृपायोगातील मूलतत्त्वाची शिकवण देणारी श्री गुरुगीता !
‘वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेनंतर भारतभरातील सर्व साधकांसाठी भक्तीसत्संगात विशेष शृंखला चालू करण्यात आली आहे. या शृंखलेत साधनेची पंचसूत्री (विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे) यांच्या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. १० जानेवारी दिवशी या लेखमालेच्या दुसर्या भागात आपण ‘अर्जुनभाव’ म्हणजे अर्जुनासारखी ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे’ याची वृत्ती !’, तसेच भक्तीसत्संगातून शिकवल्या जाणार्या साधनेच्या पंचसूत्रीमुळे साधकांकडून सरासरी २० टक्क्यांपर्यंत क्रियमाण वापरले जाऊ शकणे, ही सूत्रे पाहिली. आज या लेखमालेचा उर्वरित येथे दिला आहे.
भाग ३
भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/996394.html

४ अ. गुरूंची शिष्यांना घडवण्याची पद्धत
गुरु शिष्यांना दास, सेवक किंवा गुलाम करत नाहीत, तर ते शिष्याला आध्यात्मिक स्वरूपात घडवतात. गुरु शिष्याचे केवळ मन किंवा बुद्धी यांवर साधनेचे संस्कार करत नाहीत, तर त्यासोबत विविध प्रगट आणि अप्रगट अनुभूतींद्वारे शिष्याच्या लिंगदेहाला घडवतात. त्यामुळे गुरु आणि शिष्य यांचा सहवास अल्प कालावधीचा असला, तरी गुरुकृपेने शिष्याची आध्यात्मिक उन्नती होऊन तो स्वतः सिद्ध होतो.
हीच प्रक्रिया विशेष भक्तीसत्संगातूनही घडत आहे. विशेष भक्तीसत्संगात सांगितलेल्या पंचसूत्रीच्या आचरणामुळे साधकांकडून नवविधाभक्तीचे आचरण केले जात आहे.
४ आ. साधनेतील पंचसूत्रीच्या आचरणामुळे नवविधाभक्तीचे आचरण होणे

४ इ. विशेष भक्तीसत्संगात शिकवल्या जाणार्या साधनेच्या पंचसूत्रींच्या आचरणामुळे जिवाच्या लिंगदेहावर नवविधाभक्तीचे संस्कार होणे

विशेष भक्तीसत्संगात मानसिक आणि बौद्धिक स्तरावर नाही, तर आध्यात्मिक स्तरावर साधनेच्या पंचसूत्रींचे आचरण शिकवले जाते, उदा. औपचारिकता म्हणून विचारणे नाही, तर स्वतःची साधना म्हणून दायित्व साधक आणि संत यांना मनमोकळेपणाने विचारणे. त्यामुळे जसे सख्यभक्तीत भक्त भगवंताशी बोलतांना त्यात औपचारिकता नसते, स्वतःच्या प्रतिमेचा विचार नसतो किंवा अनावश्यक गोष्टी सांगणेही नसते; पण त्याऐवजी मनमोकळेपणा, समर्पण आणि प्रेम असते. हेच गुण निर्माण करण्याचे ध्येय विशेष भक्तीसत्संगाच्या माध्यमातून जीव घेतो.
अशा प्रकारे आध्यात्मिक स्तराच्या शिकवणीनुसार ज्या वेळी जीव तळमळीने ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करतो, त्या वेळी देवही त्याला साहाय्य करतो. या साहाय्याचे पडसाद अनुभूतींच्या स्वरूपात जिवाच्या लिंगदेहावर उमटतात आणि त्यामुळे जिवाला ‘साधनेचे प्रयत्न अशा प्रकारे केले जातात ?’, ‘देवाची सेवा अशा प्रकारे केली जाते ?’, याचा आत्मबोध होतो. थोडक्यात, साधनेच्या पंचसूत्रींच्या आचरणामुळे जिवाच्या लिंगदेहावर नवविधाभक्तीचे संस्कार होतात आणि जिवाला देवाशी एकरूप होणे पुष्कळ सहज होते.
५. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही स्तरांवर, म्हणजे सर्वसमावेशक स्तरावर असणारी विशेष भक्तीसत्संग शृंखला
या लेखातील ‘सूत्र १’प्रमाणे विशेष भक्तीसत्संग शृंखले-अंतर्गत साधना करणार्या साधकांकडून होत असलेल्या चुकांचा बोध, म्हणजे ज्ञान त्यांना दिले जाते. पुढे पंचसूत्रांचे आचरण करण्याचे ध्येय देऊन भक्तीसत्संगात सहभागी जिवांकडून योग्य कर्म करवून घेऊन त्यांच्या क्रियमाण शक्तीत वाढ केली जाते, तर कर्म करतांना देवाच्या अनुसंधानात रहाण्याचे शिकवून लिंगदेहावर नवविधाभक्तीचे संस्कार केले जातात. यातून विशेष भक्तीसत्संग शृंखला ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही स्तरांवर, म्हणजेच सर्वसमावेशक स्तरावर जिवांचा उद्धार आणि कल्याण करण्यासाठी कार्यरत असल्याचे स्पष्ट होते.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
गुरु शिष्याचा उद्धार आणि कल्याण यांसाठी करत असलेले सूक्ष्म स्तरावरील कार्य शब्दातीत, अधिकांश अप्रगट आणि अज्ञात स्वरूपाचे असते. अनेक शिष्यांना ‘गुरूंनी आपल्याला कसे घडवले ?’, याचा काही अंश बोध काही कालावधीने किंवा काही वर्षांनी होतो. वर्तमानकाळात ‘समष्टी गुरु विशेष भक्तीसत्संगाद्वारे पात्र जिवांना कशा प्रकारे घडवत आहेत ?’, या संदर्भात दोन शब्द मला लिहिता आले; म्हणून मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
अर्जुन पात्र होता; म्हणून श्रीकृष्णाने एकट्या अर्जुनालाच श्रीमद्भगवदगीतेचे ‘परम गुह्य’ ज्ञान दिले. आम्हा सर्व साधकांची पात्रता नसतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आम्ही तळमळीने करत असलेल्या प्रयत्नांमुळे आम्हाला गुरुकृपायोगाच्या मूलतत्त्वांची शिकवण देणारी ‘श्री गुरुगीता’ विशेष भक्तीसत्संगाच्या माध्यमातून मिळत आहे. ‘या ज्ञानानुसार आम्हाला प्रत्यक्ष आचरण करून श्री गुरुचरणी सर्वस्व समर्पित करता यावे, अशी तिन्ही गुरूंच्या चरणी प्रार्थना !’
(समाप्त)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक १.८.२०२५ आणि वेळ दुपारी १२.०६)
|
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !