सिवनी (मध्यप्रदेश) येथे हिंदू सेवा परिषदेच्या वतीने आयोजित सनातन संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिवनी (मध्यप्रदेश) – हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेसाठी कार्य करणार्यांनी प्रथम सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे आणि सत्यनिष्ठतेने कार्य केले पाहिजे. सत्यनिष्ठेने कार्य केल्यास संमेलने न घेताही हिंदु राष्ट्र उभे राहील, असे उद्गार प्रसिद्ध राष्ट्रवादी आणि प्रखर व्याख्याते श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी येथे काढले. हिंदू सेवा परिषदेच्या वतीने शहरात आयोजित केलेल्या सनातन संमेलनात ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. श्रीराम काणे, प.पू. नवनीत महाराज, हिंदू सेवा परिषदेचे संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष अतुल जेसवान, तसेच भोपाळ येथील धर्मरक्षक विनोद यादव व्यासपिठावर उपस्थित होते. श्री. कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले की, भीतीपोटी केलेले संघटन आणि एकता हे तात्पुरते ठरते. प्रत्येक हिंदूने भीती दूर करून धैर्याने जीवन जगावे आणि स्वतःमध्ये शौर्य विकसित करावे. असे झाले की, हिंसाचाराचा अंत चालू होईल.

सनातन संस्थेचे समन्वयक श्रीराम काणे त्यांच्या भाषणात म्हणाले की, प्रत्येक हिंदूने दैनंदिन आचरणात हिंदुत्व स्वीकारल्यास हिंदु राष्ट्र अधिक वेगाने साकार होईल. हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्याला कर्माने हिंदू बनावे लागेल. सनातन राष्ट्राचा शंखनाद झाला असून आता त्याची कार्यवाही आवश्यक आहे, असेही श्री. काणे यांनी या वेळी नमूद केले.
सनातन संमेलनाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या संमेलनात हिंदू सेवा परिषदेचे नेते, कार्यकर्ते, खासदार, आमदार, तसेच सिवनीतील २ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !