
मुंबई – छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आता लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणार्या प्रवाशांच्या सामानाची पडताळणी सुरक्षारक्षकांकडून होणार आहे. या पडताळणीत स्कॅनरद्वारे पडताळणी होईल. त्यावर ‘स्टिकर’ लागेल आणि नंतरच बॅग किंवा अन्य सामान प्रवाशांच्या हातात दिला जाऊन त्यांना पुढचा प्रवास करता येईल. विमानतळाप्रमाणे आता येथून निघणार्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी ही पडताळणी आता अनिवार्य करण्यात आली आहे. माल वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या गाड्या यांच्या स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर हे ‘स्कॅनर’ बसवण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या स्थानकांकडे जाणार्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात आले आहेत.
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !