आज असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या जन्मतिथीनिमित्त

‘वर्ष १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद शिकागो येथील धर्मपरिषदेला गेले होते. अमेरिकेत त्यांची पुष्कळ प्रसिद्धी झाली आणि त्यांचे शिष्यगण झाले. एकदा एका धर्मद्रोह्याने स्वामीजींना द्वेषपूर्ण शिव्या दिल्या. त्या वेळी त्यांनी कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या शिष्यांनी स्वामीजींना विचारले, ‘‘तुम्ही प्रतिकार का केला नाही ?’’ त्यावर स्वामीजी म्हणाले, ‘‘त्याने शिव्या दिल्या; पण मी त्या घेतल्या नाहीत. त्यामुळे तो त्या शिव्या स्वतःच्या समवेत परत घेऊन गेला.’’ यातून गुरुकृपेने मला साधनेच्या दृष्टीने पुढील सूत्रे शिकायला मिळाली.

अ. ‘आईन्स्टाईनच्या ‘सापेक्षता सिद्धांता’नुसार E = mc2. E = ऊर्जा, m = द्रव्यमान, c = प्रकाशाचा वेग. द्रव्यमान – ऊर्जा समतुल्य. (आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतानुसार वस्तुमान आणि ऊर्जा हे २ घटक एकमेकांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. याचा अर्थ असा की, वस्तुमान ऊर्जेत आणि ऊर्जा वस्तुमानात पालटू शकते. या सिद्धांतानुसार ऊर्जा निर्माण किंवा नष्ट होत नाही; परंतु ती एका स्वरूपातून दुसर्या स्वरूपात रूपांतरित होते.
त्यानुसार धर्मद्रोही व्यक्तीमध्ये असलेले कुसंस्कार शिव्यांच्या रूपात प्रगट झाले.
आ. स्वामीजींनी धर्मद्रोह्याने दिलेल्या शिव्या घेतल्या नाहीत, म्हणजे त्या शिव्या धर्मद्रोह्याकडेच राहिल्या. त्या शिव्या स्पंदनरूपात तशाच राहिल्या. आता तो धर्मद्रोही त्या शिव्या कुणालातरी वाटत फिरेल. धर्मशास्त्रानुसार म्हणजे कर्मफलन्यायानुसार त्याला त्याचे प्रारब्ध फेडावेच लागेल.
इ. स्वामीजींनी स्वतःच्या आत्मबलावर अशा अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले. त्यांच्यामधील ‘संयम, सहनशीलता, प्रेमभाव, गुरुनिष्ठा, हिंदु धर्माभिमान’ हे गुण शिकायला मिळतात.
ई. स्वामीजींनी स्वतःच्या आचरणातून त्यांच्या शिष्यांना आणि समाजाला ‘साधना, अध्यात्म अन् हिंदु धर्म’ यांची शिकवण दिली.
उ. सांप्रतकाळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग आणि त्याअंतर्गत असलेली स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, म्हणजे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुण वाढवण्यासाठी करावयाचे प्रयत्न’, यांचे महत्त्व वरील प्रसंगावरून अधोरेखित होते.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने वरील सूत्रे मला शिकायला मिळाली’, त्याबद्दल मी त्यांच्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.८.२०२५)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !