Delhi Bulldozer Action : मुसलमानांकडून मशिदीवर कारवाई करण्यात येत असल्याची अफवा पसरवून दगडफेक !

  • देहलीत मुसलमानबहुल तुर्कमान गेट येथे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई

  • ५ पोलीस घायाळ

घटनास्थळ

नवी देहली : देहलीतील जुन्या देहली परिसरातील मुसलमानबहुल तुर्कमान गेट जवळ फैज-ए-इलाही मशिदीच्या परिसरात महानगरपालिकेकडून ६ जानेवारीच्या मध्यरात्री बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात आली. देहली उच्च न्यायालयाच्या आदेशाने या परिसरातील अवैध बांधकामे बुलडोझरद्वारे पाडण्यात आली. हा संपूर्ण भाग प्रसिद्ध रामलीला मैदानाच्या जवळ आहे. या कारवाईच्या वेळी धर्मांध मुसलमानांकडून पालिका कर्मचारी आणि देहली पोलीस यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यात ५ पेक्षा अधिक पोलीस घायाळ झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम लाठीमार केला आणि नंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

पोलिसांवर केलेल्या दगडफेकीच्या प्रकरणी पोलिसांनी आदिल कासिफ, महंमद कैफ, महंमद आरिब, उजैफ, अजीम आणि इरफान यांना अटक केली आहे. तसेच सामाजिक माध्यमांतून मशिदीवर कारवाई करण्यात येत असल्याची अफवा पसरवणार्‍यांचा शोध घेतला जात आहे. अदनान आणि समीर या २ जणांनी व्हिडिओ आणि ध्वनीमुद्रण प्रसारित केल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. ७ जानेवारीला दुपारी पोलिसांनी ध्वजसंचलनही केले.

१. महानगरपालिकेने मध्यरात्री ३० बुलडोझर लावून हे अतिक्रमण हटवले. येथे २०० ट्रकच्या साहाय्याने पाडकाम केल्यानंतर ढिगारा उचलण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. पोलिसांनी या परिसराकडे येणार्‍या सर्व रस्त्यांवर तात्पुरते अडथळे लावून ते बंद केले आहेत.

२. ६ जानेवारीला देहली उच्च न्यायालयाने येथील मशीद आणि कब्रस्तान यांना लागून असलेल्या भूमीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस दिली होती. याचिकाकर्त्या समितीचे म्हणणे आहे की, ही वक्फची संपत्ती आहे.

३. अतिरिक्त भूमीवरील मालकी किंवा वैध नियंत्रण असल्याची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, असे पालिकेचे या प्रकरणावर म्हणणे आहे. याच सूत्राला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर नोटीस प्रसारित करण्यात आली. अतिक्रमण हटवण्यावर आम्हाला काहीही आक्षेप नाही, असे न्यायालयात मुसलमान पक्षाच्या समितीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांवर आक्रमण करणारा जमाव मला ठार करील ! – याचिकाकर्ता प्रीत सिरोही यांनी व्यक्त केली भीती

याचिकाकर्ता प्रीत सिरोही

ज्या याचिकेवरून देहली उच्च न्यायालयाने तुर्कमान गेटच्या जवळील अतिक्रमण पाडण्याचा आदेश दिला, ती याचिका प्रीत सिरोही यांनी प्रविष्ट केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई करतांना पोलिसांवर धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली.

यावरून प्रीत सिरोही यांनी ‘एक्स’वर म्हटले,

‘हनुमानजी, माझे रक्षण करा. जे पोलिसांवर आक्रमण करत आहेत, ते मला काय सोडतील ? मी तर स्वतःच म्हणतो, ‘ही गर्दी मला मारून टाकेल.’

संपादकीय भूमिका

  • देहली उच्च न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात येणार्‍या कारवाईवर मुसलमानांकडून दगडफेक केली जाते, यावरून ‘ते न्यायालयाचाही मान राखत नाहीत’, हे लक्षात घ्या !
  • देशातील कुठल्याही मुसलमानबहुल भागात पोलीस, प्रशासन कुणीही कारवाई करण्यास गेले, तर अशी स्थिती नेहमीच का निर्माण होते ?, याचे उत्तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष देतील का ?