|

कोतवडे, ६ जानेवारी (वार्ता.) – स्वयंभू आणि जागृत देवस्थान असलेल्या ग्रामदेवी श्री महालक्ष्मी मंदिराचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी सर्व कोतवडेवासिय नेहमीच दक्षता घेतात; परंतु या जागृत देवस्थानाच्या जवळच १ जानेवारी २०२६ पासून ‘आहिल हलाल चिकन सेंटर’ चालू करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी ग्रामस्थांच्या भावना अतिशय तीव्र असून या चिकन सेंटरच्या विरोधात समस्त ग्रामस्थ एकवटत आहेत. ‘मंदिराजवळील हे चिकन सेंटर त्वरित हटवण्यात यावे’, अशी मागणी कोतवडेवासियांची केली आहे. ६ जानेवारी या दिवशी ग्रामस्थांनी सरपंच संतोष बारगोडे यांची भेट घेऊन त्यांना याविषयी निवेदन देण्यात आले.
या वेळी सर्वश्री संदीप गोताड, सुरज पालये, गिरीश नाचणकर, आशिष धुंदूर, महेश वझे, प्रीतम नाचणकर हे उपस्थित होते. ‘या चिकन सेंटरला अनुमती देण्यात येऊ नये आणि हे चिकन सेंटर त्वरित हटवावे’, यासाठी कोतवडे गावातील विविध वाड्यांचे प्रमुख आणि ग्रामस्थ यांनी या निवेदनावर स्वाक्षर्या केल्या असून हे निवेदन सरपंच संतोष बारगोडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

ग्रामदेवेतेच्या मंदिराजवळ मांसविक्री हा ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार !
या निवेदनात म्हटले आहे की, श्री महालक्ष्मीदेवीच्या जागृत देवस्थानाची अनुभूती अनेक ग्रामस्थांनी वेळोवेळी घेतली आहे. श्री महालक्ष्मीमाता हे संपूर्ण गावाचे श्रद्धेचे केंद्र आहे. मंदिराचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी समस्त ग्रामस्थ शुचिर्भूत होऊनच मंदिरात येतात. कुणी मद्यप्राशन किंवा मांसाहार केला असेल, तर मंदिरात प्रवेश टाळतात. श्रावण महिन्यात मद्य, मांस त्यागून समस्त ग्रामस्थ मंदिरात मोठ्या भक्तीभावाने नामसप्ताह साजरा करतात. ग्रामस्थ अशा प्रकारे मंदिराचे पावित्र्य जपत असतांना मंदिराजवळ मांसविक्रीला अनुमती देणे, म्हणजे एक प्रकारे ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावण्याच प्रकार आहे. ग्रामदेवीचे स्थान आणि मंदिराचे पावित्र्य हे कोणत्याही प्रकारचा वाद अन् राजकारण यांपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या श्रद्धेचा विचार करून ग्रामपंचायत प्रशासनाने या चिकन सेंटरला अनुमती देऊ नये. भविष्यातही ग्रामदेवीच्या मंदिराजवळ मद्य, मांस आदी निषिद्ध प्रकारांना अनुमती देण्यात देऊ नये.
जागेचे आणि चिकन सेंटरचे मालक यांना नोटीस पाठवणार ! – संतोष बारगोडे, सरपंच, कोतवडे ग्रुप ग्रामपंचायत
चिकन सेंटर चालू करण्याविषयी गाळ्याचे मालक किंवा चिकन सेंटरचे मालक यांनी कोणतीही अनुमती घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीकडून नोटीस पाठवली जाणार आहे. ‘ग्रामदेवीच्या मंदिराजवळ मांसविक्री होऊ नये’, अशी आमचीही भूमिका आहे.
विशेष१. ग्रामदेवी श्री महालक्ष्मीदेवी मंदिराजवळील चिकन सेंटर हटवण्यात यावे, यासाठी काही जागरूक ग्रामस्थांनी वाड्यावाड्यांमध्ये जाऊन वाड्यांचे प्रमुख, ग्रामस्थ यांच्या भेटीगाठी घेतल्या. विषयाचे गांभीर्य ओळखून वाडीप्रमुख, तसेच ग्रामस्थ यांनी आजूबाजूच्या घरांमध्ये स्वत: जाऊन याविषयी माहिती दिली आणि निवेदनावर स्वाक्षर्या घेतल्या. २. सनगरेवाडीमध्ये महिल्याच्या मासिक बैठकीमध्ये महिलांनी याविषयीचे निवेदन वाचून दाखवले आणि उपस्थित सर्व महिलांनी निवेदनावर स्वाक्षर्या केल्या. ३. गावातील जागरूक युवकांनी याविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला. नोकरी करणार्या युवकांनी कामावरून आल्यावर रात्री वाड्यावाड्यांमध्ये फिरून या गंभीर प्रकाराची माहिती दिली आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या घेतल्या. |
संपादकीय भूमिकामंदिराचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी पुढाकार घेणारे युवक आणि अन्य ग्रामस्थ, हीच हिंदु धर्माची शक्ती होय. ग्रामदेवीच्या मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी पुढाकार घेणार्या ग्रामस्थांवर देवीची कृपा अवश्य होईल ! |
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
मुलींच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करा !
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी