
रत्नागिरी – हिंदू ही एक जीवनपद्धती आहे. हिंदु संस्कृती समावेशक, अद्वितीय आहे. ती जागतिक असून व्यक्ती, कुटुंब आणि विश्व, समाजाच्या हिताची आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये स्व-भाषा, स्व-भूषा, स्व-भोज हे विषय महत्त्वाचे आहेत. या तिन्ही गोष्टींमध्ये आपण मूल्य म्हणून पहावे आणि नवीन गोष्टीचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन लेखिका, भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सहसंघटन सचिव सौ. नयना लिमये-सहस्रबुद्धे यांनी केले. रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प त्यांनी गुंफले. त्यांनी ‘बदलती जीवनशैली आणि हिंदु कुटुंबांसमोरील आव्हाने’ याविषयी उद्बोधक विचार मांडले.
सौ. नयना सहस्रबुद्धे म्हणाल्या की,
१. हिंदु संस्कृतीने आवश्यक पालट स्वीकारले. अर्थात् काही पालट कृत्रिम आणि संघटित पद्धतीने बाजारपेठ म्हणून पूरक माहिती पेरली जाते. असे अनेक पालट समाजमाध्यमातून पेरले जात आहेत; परंतु आपण ही माहिती सत्य आहे का ? याची निश्चिती करूनच स्वीकारावी. आपल्याला धोका दिसतो तेव्हा कोणते पालट घडवायचे कोणते स्वीकारायचे हे ठरवले पाहिजे. हवं आहे ती स्वीकारायचं, नकोय ते सोडून द्यायचे याची मुभा हिंदु संस्कृतीने दिली आहे. त्यामुळे ही एक प्रकारे आध्यात्मिक लोकशाही आहे.
२. हल्ली आजच्या पिढीला घरात जेवण करायची सवय नाही; परंतु आपण बाहेरून जेवण आणले, तर त्यातील पोषणमूल्य पाहिले पाहिजे. नवीन भोजन प्रकार शिका; पण पोषणमूल्यांशी तडजोड करू नका. कपड्यात पालट होणार आहेत; परंतु फॅशन इंडस्ट्री ही एक सामूहिक यंत्रणा राबवते. त्या वेळी आपण विचार केला पाहिजे. कपडे परिधान करताना शालीनता मूल्य जपले पाहिजे. हे मूल्य पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची आपले सर्वांचे दायित्व आहे.

३. वर्ष १९९० नंतर शहरीकरण वाढले आणि एकत्र कुटुंबपद्धती बदलू लागली. आज घरात जेवण तयार आहे, हे घरातील सदस्यांना मोबाईलवर कळवले जाते. हे धोकादायक आहे. सध्या ‘रिल’च्या जमान्यात भान उरलेले नाही. त्यामुळे सकारात्मक गोष्टींच्या ‘रिल्स’ बनवा आणि त्या पाठवा. नोकरीत बैठ्या जीवनशैलीमुळे आणि ताजे अन्न न खाल्ल्याने आजार वाढले आहेत. आपण आभासी संपर्कात आहोत. कष्ट कमी झाले आणि पैसे भरपूर झाले आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी घेतला. त्यांनी बाळशास्त्रीचा जीवनपट उलगडून दाखवला. प्रास्ताविकामध्ये के.जी.एन्. सरस्वती फाऊंडेशन आणि कर्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी दर्पणच्या स्थापनादिवसानिमित्त मराठी पत्रकारदिन साजरा होतो. त्यांचे स्मरण करण्याकरता ही व्याख्यानमाला गेली २ वर्षे कर्हाडे ब्राह्मण संघ आयोजित करत असल्याची माहिती दिली. तसेच संघ शतक महोत्सवाकडे वाटचाल करत असून २ वर्षांनी शतकमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सौ. सहस्रबुद्धे यांचा सत्कार माधव हिर्लेकर यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन केला. या वेळी अशोक घाटे, उमेश आंबर्डेकर, चंद्रकांत हळबे, डॉ. शरद प्रभुदेसाई, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सौ. ऋचा जोशी, दिलीप ढवळे, प्रमोद कोनकर, शिल्पा पळसुलेदेसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले. तसेच सौ. सहस्रबुद्धे यांचा परिचय करून दिला. ‘वन्दे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्वतःचे कुटुंब टिकेल ?
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी