Assam Encroachment Eviction : आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांनी बळकावलेली १ सहस्र ७३५ एकर वन भूमी सरकारने केली मुक्त !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसाममधील होजाई जिल्ह्यातील ५ सहस्र २५० बिघा (१ सहस्र ७३५ एकर भूमी) वन भूमीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. बुलडोझरच्या साहाय्याने हे अतिक्रमण हटवण्यात आले आणि ही भूमी पुन्हा शासनाच्या नियंत्रणात घेण्यात आली. या कारवाईची माहिती देतांना मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, अतिक्रमण अजिबात खपवून घेतले जाणार नाही.

बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई

या भूमीवर १ सहस्र २५० बांगलादेशी घुसखोरांच्या कुटुंबांनी अतिक्रमण केले  होते. त्यांपैकी १५२ कुटुंबांची प्रकरणे गुवाहाटी उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यांना तात्पुरते ‘बेदखल प्रक्रिये’पासून वगळण्यात आले आहे. उर्वरित १ सहस्र ९८ कुटुंबांना सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर बाहेर काढले जात आहे.

संपादकीय भूमिका

आसाममधील भाजप सरकारचे अभिनंदन; मात्र इतक्या मोठ्या भूमीवर अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !