
चंद्रपूर, ५ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने येथील जलाराम सभागृहामध्ये झालेल्या मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत महासंघाचे ध्येय, राबवण्यात येणारे उपक्रम यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे चंद्रपूर समन्वयक श्री. गुणवंत चंदनखेडे यांनी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी श्री. चंदनखेडे आणि चंद्रपूर जिल्हा मंदिर संयोजक श्री. वासुदेवराव राठोड यांनी प्रत्येक मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, मंदिरांमध्ये महाआरती चालू करणे, मंदिरांचा परिसर मांस-मद्यमुक्त करणे, भूमाफियांनी बळकावलेली मंदिरांची भूमी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे यांसंदर्भात मार्गदर्शन केले.
‘मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्र झाली पाहिजेत. मंदिर विश्वस्तांचे संघटन झाले पाहिजे’, असे मत चंद्रपूर आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तथा गायत्री मंदिर विश्वस्त डॉ. शैलेंद्र शुक्ला यांनी मांडले. महासंघाने राबवलेल्या उपक्रमांची माहिती समितीचे श्री. नामदेव उरकुडे यांनी दिली. या बैठकीला चंद्रपूर येथील २० मंदिर विश्वस्त उपस्थित होते.
क्षणचित्र –
मंदिर विश्वस्तांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्यासाठी मंदिर विश्वस्तांची बैठक लवकरच चालू करू, असे श्री. ओम महेश्वरी यांनी सांगितले.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील रासायनिक लेपनाची स्थगिती जिल्हा न्यायालयाने उठवली !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत