रत्नागिरी येथे ‘सनातन प्रभात’चा २६ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा !

रत्नागिरी, ४ जानेवारी (वार्ता.) : उद्योगामुळे प्रतिदिन १० वर्तमानपत्रे वाचावी लागतात. इतर वर्तमानपत्रे वाचतांना ती आणि ‘सनातन प्रभात’ यांतील भेद लक्षात येतो. इतर वर्तमानपत्रांतील बातम्यांमुळे गोंधळायला होते; कारण ही वर्तमानपत्रे केवळ समाजासाठी नसतात. त्यामधून ‘निगेटिव्ह पब्लिसिटी’ (नकारात्मक प्रसिद्धी) केली जाते. त्यामुळे वाचकाच्या मनातही नकारात्मक भावना निर्माण होतात. त्याउलट ‘सनातन प्रभात’मधून राष्ट्र-धर्म, साधना आदींविषयी योग्य ऊहापोह केलेला असतो. त्यामुळे भ्रमणभाष (मोबाईल) बाजूला ठेवून अन्य वाचन केले पाहिजे, असे आवाहन पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले.

शहरातील टी.आर्.पी. जवळील श्रद्धा साफल्य मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वधार्पनदिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिन विशेषांकाचे पूजन सनातनचे साधक श्री. नितीन चेचरे यांनी केले.
![]() |
वर्धापनदिन सोहळ्याचा प्रारंभ सनातनचे साधक श्री. संतोष धनावडे यांनी केलेल्या शंखनादाने झाला. त्यानंतर मान्यवर सदगुरु सत्यवान कदम, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि. व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्रपठण वेदमूर्ती श्री. केतन शहाणे आणि श्री. अवधूत मुळ्ये यांनी केले. पुरोहितांचा सत्कार सनातनचे साधक श्री. शशिकांत घाणेकर यांनी केला. यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी वर्धापनदिनानिमित्त पाठवलेल्या संदेशाचे वाचन सनातनच्या १३३ व्या संत पू. (सौ.) अंजली करंबेळकर यांनी केले.

व्यासपीठ सन्मान आणि सत्कार
१. सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान पतंजलि योग समिती परिवारातील भारत स्वाभिमान ट्रस्ट, रत्नागिरी विभाग संघटनमंत्री श्री. विनय साने यांनी केला.
२. पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि. व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांचा सत्कार सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके यांनी केला.
३. दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांचा सत्कार डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केला.
संत सन्मान
पू. (सौ.) अंजली करंबेळकर यांचा सन्मान हितचिंतक सौ नंदिनी सावंत यांनी केला

वितरकांचा सत्कार
श्री. अनिल मांडवकर आणि श्री. कृष्णा लिंगायत यांचा सत्कार डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी केला. श्री. गणपत निवळकर यांचा सत्कार सदगुरु सत्यवान कदम यांनी केला.
डॉ. रवींद्र प्रभुदेसाई पुढे म्हणाले की,

१. ‘सनातन प्रभात’चा जन्म हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झाला आहे. ‘त्यातील अग्रलेखांमधून जगात हिंदूंची काय स्थिती आहे ?’, हे मांडण्यात येते. ‘सनातन प्रभात’मधून काय योग्य ? काय अयोग्य याचे मार्मिक विश्लेषण केलेले असते. यांमुळे विचारात स्पष्टता येते.
२. ‘सनातन प्रभात’ केवळ वाचून थांबायला नको, तर कृतीही करायला हवी. जगभरात हिंदूंवर होणार्या आघातांच्या विरोधात आपण वैध मार्गाने आंदोलन करायला हवे. जगात हिंदूंसाठी भारत हा एकमेव देश आहे, हे लक्षात घेऊया.
३. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ‘सनातन प्रभात’मधून साधना हा विषय मांडला आहे. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांचे चांगल्या प्रकारे विश्लेषण केले आहे. व्यायाम, ज्योतिष, वास्तूशास्त्र आदी अनेक विषयांची विस्तृत माहिती ‘सनातन प्रभात’मध्ये येत आहे. सर्वांनी याची कात्रणे काढून ठेवूया. ‘सनातन प्रभात’मधील लेखांमुळे व्यक्तीची ऐहिक, आध्यात्मिक उन्नती होते.
४. दैनिक ‘सनातन प्रभात’ हा अंक आपण कायम सोबत ठेवायला हवा. हा अंक सोबत असल्यामुळे अनेक संकटांतून मुक्ती झाल्याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे.
५. आजचा ‘सनातन प्रभात’चा अंक व्यासपिठावरून दाखवतांना श्री. प्रभुदेसाई म्हणाले की, आरंभी आकाशाचा निळा रंग आहे. आकाशतत्त्वाचे चैतन्य आपल्या ठायी निर्माण करणारा ‘सनातन प्रभात’ आहे.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा आशीर्वाद या अंकाला लाभला आहे, त्यामुळे ही घोडदौड शक्य झाली. त्यामुळे तुम्ही सर्वांनीही ‘सनातन प्रभात’चे वाचन करा. त्याचे आचरण केले तर अशा प्रकारचे यश निश्चितच लाभेल.
वाचकाला धर्मभूत ज्ञान करून देणारे ‘सनातन प्रभात’ एकमेव ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
(धर्मभूत ज्ञान म्हणजे आत्म्याच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान)

कोणत्याही व्यावसायिक लाभ किंवा अर्थार्जन हा दैनिक ‘सनातन प्रभात’चा हेतू नाही. ‘सनातन प्रभात’चा उद्देश हा समाजजागृती आणि विझत चाललेली, काजळी धरलेली धर्मशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणे, हा आहे. समस्त हिंदु संघटनांचे सनातन प्रभात हे हक्काचे व्यासपीठ आहे. हिंदूंवर झालेल्या अन्यायाला आज कोणत्याही माध्यमातून वाचा फोडली जात नाही. सर्व माध्यमे या विषयाला बगल देतात; मात्र केवळ ‘सनातन प्रभात’ याविषयी आतापर्यंत आवाज उठवत आले आहे. हिंदूंना देवतांचे विडंबन कळत नव्हते. आपल्याच देवतांच्या विटंबनावर हिंदू टाळ्या वाजवायचे, हे ‘सनातन प्रभात’मुळे समाजाला लक्षात येऊ लागले. ‘सनातन प्रभात’मधील बातम्या, लेख या माध्यमातून जे बीज समाजात रोवले गेले, त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. वाचकाला धर्मभूत ज्ञान देण्याचे कार्य करणारे ‘सनातन प्रभात’ एकमेव दैनिक आहे. ‘सनातन प्रभात’ मधील विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. ‘सनातन प्रभात’च्या रूपाने ईश्वरी राज्याचा म्हणजेच हिंदु राष्ट्राचा कवडसा आपल्या हाती लागला आहे. येणारा काळ हा हिंदु राष्ट्राचा आहे. या काळात ‘सनातन प्रभात’चा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल, यात शंका नाही !
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात वाचकांची कृतीशीलता हेच ‘सनातन प्रभात’चे यश ! – प्रीतम नाचणकर, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’

ज्या काळात हिंदु, हिंदुत्व हे शब्दच ‘धर्मांध’ ठरवले जात होते, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना राज्यघटनेच्या विरोधात आहे’, असे खोटे कथानक (फेक नॅरेटिव्ह) निर्माण करण्यात आले होते, तसेच ‘हिंदु राष्ट्र’हा शब्द उच्चारणेही जणू गुन्हा होते, अशा प्रतिकूल काळात ‘सनातन प्रभात’ने ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना मांडली. ती प्रत्येक हिंदूंपर्यंत पोचवली आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंमध्ये विश्वास निर्माण केला. परिणामस्वरूप आज संपूर्ण भारतवर्षातील हिंदुत्वनिष्ठ संघटना भारत ‘हिंदु राष्ट्र’ व्हावे, यासाठी कार्यरत आहेत. यामध्ये ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे योगदान मोलाचे आहे. अन्य कोणत्याही वृत्तपत्राला लाभले नाहीत, असे कृतीशील वाचक ‘सनातन प्रभात’ला लाभले आहेत. आमचे वाचक ‘सनातन प्रभात’ वाचतात आणि त्यानुसार धर्माचरण करण्याचा अन् धर्महानी रोखण्याचा प्रयत्न करतात. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा कृतीशील सहभाग हेच ‘सनातन प्रभात’चे मोठे यश आहे. इतिहासामध्ये ‘सनातन प्रभात’ची आणि अशा कृतीशील वाचकांची नोंद होईल.
‘सनातन प्रभात’विषयी वाचकांनी व्यक्त केली मनोगते
१. ‘सनातन प्रभात’चा प्रचार हा धर्मप्रसाराचाच भाग ! – श्री. प्रथमेश आगाशे, शिरगाव, रत्नागिरी

हिंदु धर्माविषयीचे जागृतीचे लेख, धर्मावरील आघात हे कुठेही वाचायला मिळत नाहीत, ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मिळतात. आधुनिकतेच्या दिशेने जातांना धर्माला धरून कसे रहावे ? याचे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’मधून केले जाते. ‘सनातन प्रभात’मधून आपल्या परीने धर्मजागृती कशी करू शकतो ? याचे मार्गदर्शन मिळते. योग्य दृष्टीकोन मिळतात. ‘सनातन प्रभात’मधून हिंदूसंघटन, ईश्वरप्राप्तीसाठीचे प्रयत्न यांचा प्रचार आणि प्रसार होतो. त्यामुळे ‘सनातन प्रभात’चा प्रचार हा धर्मप्रसाराचाच भाग आहे.
२. छुप्या शत्रूंचे भिंग फोडण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करते ! – वैद्य मंदार भिडे, रत्नागिरी

हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव आहे. या दैनिकात मनोरंजन, राशिभविष्य, चित्रपट असे काहीही नाही. धर्मविरोधी गोष्टींना प्रथम पानावर ठळकपणे प्रसिद्ध केली जाते. केवळ प्रसिद्ध न देता त्यामध्ये योग्य दृष्टीकोन कसा असला पाहिजे ? हेही सांगितले जाते. हिंदु धर्माच्या विरोधातील जे छुपे शत्रू आहेत, त्यांचे भिंग फोडण्याचे काम करते. त्यांचा धर्माविषयीचा द्वेष ‘सनातन प्रभात’मधून दर्शवण्यात येतो. सूक्ष्मातील युद्ध हा पूर्णपणे वेगळा विषय केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून मांडला जातो.
३. ‘सनातन प्रभात’ सर्वसामान्य हिंदूंना खरा हिंदु बनवते ! – श्री. सुनील वाडेकर, इलेक्ट्रिक इंजिनीयर, चिपळूण
‘सनातन प्रभात’ सर्वसामान्य हिंदूंना खरा हिंदु बनवते. देव, देश, धर्म यांविषयीचे कर्तव्य ‘सनातन प्रभात’मुळे समाजाला कळते. ‘सनातन प्रभात’मधून केवळ बातम्या न देता हिंदूंच्या कथा आणि व्यथा मांडल्या जातात.
४. चांगले विचार देणारे ‘सनातन प्रभात !’ – श्री. गोपाळभाई पटेल, पाटीदार समाज, रत्नागिरी.
रोपांना वाढायला सूर्यकिरणांची आवश्यकता असते. त्याप्रमाणे मनुष्याच्या प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. हे चांगले विचार ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध केले जातात. धाडसाविना यश मिळत नाही. सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्याला उंचीवरून खाली पडावे लागते. दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य त्याच प्रकारे चालू आहे.

विशेष
दैनिक ‘सनातन प्रभात’ वर्धापनदिन सोहळ्यासाठी रत्नागिरीतील उद्योजक श्री. नितीन कुलकर्णी यांनी श्रद्धा साफल्य मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले. |
उपस्थित मान्यवर
दैनिक ‘सनातन प्रभात’ वर्धापनदिनाला उपस्थित मान्यवर –
कीर्तनसंध्या आयोजन समितीचे श्री. उमेश आंबर्डेकर, श्री. नितीन नाफड, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. प्रभाकर खानविलकर, उद्योजक श्री. अनिल देवळे, सौ. उमा देवळे, श्री सौरभ देवळे, उद्योजक केशवराव इंदुलकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. चंद्रकांत राऊळ, श्री. विजयकुमार शिंदे, श्री. शैलेश बेर्डे, श्री. संदीप नाचणकर, पाटीदार समाजाचे श्री. महेश पटेल उपस्थित होते.


Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !