
काराकस (व्हेनेझुएला) – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘व्हेनेझुएलावर काही काळासाठी अमेरिकेचे नियंत्रण रहाणार’, असे म्हटले आहे. तसेच व्हेनेझुएलामधील तेलाचे साठे अमेरिका नियंत्रणात घेणार असून त्याची विक्री इतर देशांना करणार आहे. व्हेनेझुएलाच्या नागरिकांचे हित करण्यात कोणताही रस नसणार्या व्यक्तीच्या हातात आम्ही व्हेनेझुएलाची सत्ता देणार नाही, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
आता मेक्सिको, क्युबा आणि कोलंबिया यांचा क्रमांक !
ट्रम्प यांनी दक्षिण अमेरिका खंडातील इतर देशांनाही चेतावणी दिली आहे.
अमली पदार्थांचे उत्पादन करणार्यांना आश्रय देणार्या येथील मेक्सिको, क्युबा आणि कोलंबिया देशांना डॉनल्ड ट्रम्प यांनी या देशांना ‘व्हेनेझुएलानंतर तुमच्या देशांवर आक्रमणे होऊ शकतात’, अशी चेतावणी दिली आहे.
व्हेनेझुएलावरील कारवाईत ४० जणांचा मृत्यू
अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी कराकस शहरावर केलेल्या हवाई आक्रमणात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. व्हेनेझुएलाच्या सैन्यातील एका वरिष्ठ अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सीलिया फ्लोरेस यांना पकडून अमेरिकेत नेले असून त्यांच्यावर मॅनहॅटन येथील फेडरल न्यायालयात खटला चालवला जाणार असल्याची माहिती आहे.
संपादकीय भूमिकाअमेरिकेने ज्या देशात हस्तक्षेप केला, तो देश रसातळाला गेला, हा इतिहास आहे. अफगाणिस्तान त्याचे उत्तम उदाहरण आहे. भविष्यात व्हेनेझुएलाचीही अदोगती झाल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !