|

ढाका (बांगलादेश) – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आदेशानंतर कोलकाला नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी खेळाडू मुस्ताफिझूर रहमान याला संघातून काढल्यानंतर त्याचे पडसाद बांगलादेशात उमटले आहेत. बांगलादेश सरकारचे सल्लागार असिफ नझरुल यांनी पुढील महिन्यात होणार्या ‘टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशाचे भारतात होणारे सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी सूचना केली आहे. ‘बांगलादेश क्रिकेटचा, क्रिकेटपटूंचा अपमान सहन केला जाणार नाही. बांगलादेशात इंडियन प्रिमियर लिग (आय.पी.एल्.) स्पर्धेचे प्रसारण होऊ नये, यासाठी सूचना देण्यात आली आहे. गुलामीचे दिवस सरले. आता असे चालणार नाही’, असेही असिफ यांनी स्पष्ट केले.
🩸 Bangladesh Threatens Over Cricket, India Stays Silent on Atrocities
“Insult to Bangladeshi cricketers won’t be tolerated!” – threatens Bangladesh’s interim regime.
📺 Indian Premier League broadcasts banned.
⚠️ Note this clearly: India has not once shown the courage to… https://t.co/64beBot8Us pic.twitter.com/qj7yew3mbn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 4, 2026
भारतीय संघाचा बांगलादेश दौरा स्थगित
बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्या आक्रमणांच्या विरोधात भारतात बांगलादेशाच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. यातूनच आय.पी.एल्. स्पर्धेत बांगलादेशाच्या खेळाडूला बाहेर काढण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर रहमान याला काढण्यात आले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सप्टेंबर महिन्यात होणार्या भारतीय संघाच्या बांगलादेश दौर्याचे वेळापत्रक घोषित केले होते; मात्र बीसीसीआयने हा दौरा स्थगित केला.
या दौर्यासंदर्भात आणि मुस्ताफिझूर रहमान याला आय.पी.एल्.मधून काढण्याविषयी आम्हाला बीसीसीआयकडून औपचारिकदृष्ट्या कळवण्यात आलेले नाही. ते कळवल्यानंतर पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ, असे बांगलादेश क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी सांगितले.
संपादकीय भूमिका‘हिंदूंच्या हत्या, त्यांच्यावरील अत्याचार सहन करणार नाही’, असे भारताने एकदाही बांगलादेशाला ठणकावून सांगण्याचे धाडस दाखवलेले नाही, हे लक्षात घ्या ! |
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण