
पुणे – पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २ डिसेंबर या दिवशी कात्रज जंक्शन येथील ‘एस्.एस्.टी.’ (पुणे) येथे नाकाबंदी क्षेत्रात निरीक्षणासाठी प्रशिक्षित असणार्या पथकाने (‘सर्व्हिलंस स्कॉड टिम’) चारचाकीतून ६७ लाख रुपयांची रोख रक्कम वाहनासह कह्यात घेतली. एस्.एस्.टी. पथक प्रमुख अधिकारी आरोग्य निरीक्षक सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
वाहन मालक तुषार मिरजकर, सहकारी अनिल कामठे आणि गणेश जगताप हे प्रवास करत होते. चौकशी दरम्यान ही रक्कम सासवड तालुक्यातील तक्रारवाडी येथील गट क्रमांक १३५ ही भूमी खरेदी करण्यासाठी रोख स्वरूपात देण्यासाठी नेत असल्याचे सांगण्यात आले; मात्र निवडणूक आचारसंहिता पार्श्वभूमीवर रकमेची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी पंचनामा करून रक्कम जप्त केली. वाहन महापालिकेच्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती नोडल अधिकारी श्रीपाद नाईक यांच्या वतीने आयकर विभागाला देण्यात आली आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !