|

इंदूर (मध्यप्रदेश) : शहरातील भागीरथपुरामध्ये दूषित पाणी प्यायल्याने आतापर्यंत १४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या दूषित पाण्यामुळे बाधित झालेले १६२ लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी इंदूरमध्ये जाऊन वेगवेगळ्या रुग्णालयांना भेट देऊन आजारी लोकांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी अधिकार्यांची बैठक घेतली.
इंदौर के भागीरथपुरा में घटित दुखद घटना से प्रभावित प्रत्येक परिवार के प्रति राज्य सरकार पूर्ण संवेदना और जिम्मेदारी के साथ खड़ी है : CM @DrMohanYadav51 #CMMadhyaPradesh pic.twitter.com/ojHtLuLrhY
— Chief Minister, MP (@CMMadhyaPradesh) December 31, 2025
मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले,
‘‘अशी त्रासदायक परिस्थिती पुन्हा कधीही निर्माण होऊ नये. तुम्ही सर्वांनी यासाठी व्यापक नियोजन करावे. दूषित पाण्याच्या संदर्भात अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.’’ पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे त्यात सांडपाणी मिसळले. हे दूषित पाणी प्यायल्याने लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंत २ अधिकार्यांना निलंबित करण्यात आले आहे.
इंदौर के भागीरथपुरा की दुखद घटना से प्रभावित हर परिवार के साथ राज्य सरकार पूरी संवेदनशीलता के साथ खड़ी है।
आज इंदौर के अस्पतालों में उपचाररत प्रभावित नागरिकों, उनके परिजनों एवं उपचार में जुटे चिकित्सकों से भेंट कर स्थिति की जानकारी ली और मरीजों का कुशलक्षेम जाना। pic.twitter.com/0BTe1ZRi8V
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) December 31, 2025
मंत्री कैलाश विजयवर्गीय यांची असंवेदनशीलता !
मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत सहभागी होऊन मंत्री कैलाश विजयवर्गीय बाहेर आले, तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना उपचारात खर्च झालेल्या पैशांचा परतावा न मिळाल्याबद्दल विजयवर्गीय म्हणाले, ‘अरे सोडा यार…तुम्ही फुकट प्रश्न विचारू नका.’ यावर पत्रकार म्हणाले की, ‘हा फुकट प्रश्न नाही. आम्ही तिथे जाऊन आलो आहोत.’ यावर उत्तर देतांना मंत्री विजयवर्गीय यांनी चिडून अपशब्द वापरले. या नंतर काही वेळाने त्यांनी ‘एक्स’वरून खेद व्यक्त केला.

काँग्रेसने विजयवर्गीय यांचे त्यागपत्र मागितले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी एक्सवर मुख्यमंत्र्यांना उद्येशून म्हटले की, मुख्यमंत्री यादवजी, तुमचे सरकार आणि तुमचे मंत्री हा काय तमाशा करत आहेत ? पीडितांना विनामूल्य उपचार मिळत नाहीत, सहानुभूतीही मिळत नाही, वरून तुमचे अहंकारी मंत्री अपशब्दांचा वापर करत आहेत. थोडी जरी लाज शेष असेल, तर अशा उद्धट मंत्र्यांकडून नैतिकतेच्या आधारावर तात्काळ त्यागपत्र घ्या.
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागितला
भागीरथपुरात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठात २ जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. यांपैकी एक इंदूर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष रितेश इंसानी यांनी, तर दुसरी भागीरथपुरा येथील रहिवासी राहुल गायकवाड यांनी प्रविष्ट केली आहे. यावर सुनावणी करून न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल २ जानेवारीला सविस्तर सादर करण्याचा आदेश दिला.
संपादकीय भूमिकाजनतेच्या जिवाशी खेळणारे जनताद्रोही प्रशासन ! यास उत्तरदायी असणार्या सर्व उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! |
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद