
कानपूर (उत्तरप्रदेश) – म्यानमारमधील रोहिंग्या घुसखोर मुसलमानांना भारतात बेकायदेशीररित्या वसवणार्या टोळीतील महंमद इब्राहिम याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. भारतातील १२ राज्यांत २०० हून अधिक रोहिंग्यांना त्याने वसवले असल्याचा संशय आहे. रोहिंग्या घुसखोरांचे जाळे म्यानमार, त्यानंतर बांगलादेश आणि तेथून भारतात आसामपासून काश्मीरपर्यंत पसरले आहे. ओळख पटू नये; म्हणून वेगवेगळ्या राज्यांत ते लपून रहात असल्याचे दिसून आले.
१. कानपूर सेंट्रल स्थानकावर पकडलेल्या महंमद इब्राहिम, महंमद हासिम उपाख्य नासिर आणि शोकतारा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तिघेही मूळचे म्यानमारमधील नासाफुरु जिल्ह्यातील मोगंडो राखीन परिसरातील आहेत. ते बांगलादेशातील निर्वासित छावणीत रहात होते.
२. महंमद इब्राहिम वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून भारतात आला. काही काळ तो देहलीत राहिला आणि वर्ष २०२४ मध्ये जम्मूमध्ये गेला. त्यानंतर तो बांगलादेशातून रोहिंग्यांना भारतात आणून स्थायिक करण्याच्या कामात सक्रीय झाला. अन्वेषण यंत्रणा त्याची सखोल चौकशी करत आहेत.
संपादकीय भूमिकाअशांनाही फाशीचीच शिक्षा देण्याचा कायदा करणे आता आवश्यक झाले आहे ! |
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय