न्यायालयानेही अशा प्रकारची शपथ घेण्यास सांगणे चुकीचे असल्याचे केले मान्य

ओटावा (कॅनडा) – कॅनडातील अल्बर्टा प्रांतात तेथील सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत धार्मिक स्वातंत्र्याला घटनात्मक परंपरांपेक्षा अग्रक्रम दिला आहे. अल्बर्टा कोर्ट ऑफ अपीलने निर्णय दिला की, नव्याने वकिली व्यवसायात प्रवेश करणार्या अधिवक्त्यांना राजा चार्ल्स यांच्या प्रति निष्ठेची शपथ घ्यायला भाग पाडणे, त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन ठरते. हा निर्णय एडमंटन येथील शीख अधिवक्ता प्रभजोत सिंह व्हायरिंग यांच्या दृष्टीने मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे. त्यांनी धार्मिक कारणास्तव राजाप्रती निष्ठेची शपथ घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा बार असोसिएशनमध्ये प्रवेश रोखला गेला होता.
१६ डिसेंबरला दिलेल्या या सर्वानुमते निर्णयात न्यायालयाने मान्य केले की, अशी अनिवार्य शपथ ‘कॅनडियन चार्टर ऑफ राइट्स अँड फ्रीडम्स’मध्ये दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काच्या विरोधात आहे.
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !