धर्माच्या नावाखाली मानवतेविरुद्ध अपराध केला जात असल्याचे संतांचे मत

काठमांडू (नेपाळ) – बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ हिंदू आणि संत यांनी मोठ्या संख्येने जनकपूरधाम येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केली. प्राचीन जनकपूर शहरातील जानकी मंदिर परिसरातून प्रारंभ झालेल्या निषेध मोर्चात बांगलादेशामध्ये ठार मारण्यात आलेले हिंदु युवक दीपू चंद्र दास यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी या घटनेला ‘अमानवीय आणि धर्माच्या नावाखाली मानवतेविरुद्धचा अपराध’, असे म्हटले. त्यांनी अल्पसंख्य हिंदूंवरील हिंसा त्वरित थांबवावी, अशी मागणी करत घोषणा दिल्या आणि बांगलादेशाचा ध्वज जाळला.
निषेध मोर्चा ‘रामानंदिया वैष्णव संघा’कडून आयोजित करण्यात आला होता. जानकी मंदिराचे उतराधिकारी महंत राम रोशन दास यांनी सांगितले, ‘मी नेपाळ सरकारलाही चेतावणी दिली आहे की, त्याने शक्य त्या सर्व मार्गांनी बांगलादेशावर दबाव आणावा. कुणालाही दुसर्याचे प्राण घेण्याचा अधिकार नाही.’
युनूस यांच्या सत्ताकाळात हिंदूंना जिवंत जाळले जात आहे ! – शेख हसीना

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी नाताळच्या संदेशात म्हटले की, अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या सत्ताकाळात हिंदूंवरील अत्याचार सतत चालू आहेत. हिंदूंना जिवंत जाळले जात आहे. बांगलादेशामध्ये बेकायदेशीररित्या सत्तेवर बसलेल्या विद्यमान सरकारने सर्व धर्मियांच्या धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप केला आहे. विशेषत: मुसलमानेतरांवर अत्याचार होत आहेत. धार्मिक अल्पसंख्यांकांना जाळून ठार मारण्यासारख्या भीषण घटना घडल्या आहेत. बांगलादेशातील लोक हा ‘काळा काळ’ अधिक काळ सहन करणार नाहीत, असा मला पूर्ण विश्वास आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !