इस्रोने रचला इतिहास

नवी देहली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (‘इस्रो’ने) आंध्रप्रदेशातील श्रहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अमेरिकी उपग्रह ‘ब्यूबर्ड ब्लॉक २’चे यशस्वी प्रक्षेपण केले. ‘ब्यूबर्ड ब्लॉक २’ या उपग्रहाचे वजन ६ सहस्र १०० किलो आहे. भारताने अंतराळात पाठवलेला हा आतापर्यंतचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे. २४ डिसेंबरला सकाळी ८.५५ वाजता या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘ब्लूबर्ड ब्लॉक २’ हा उपग्रह ‘ब्राँडबँड कनेक्टिव्हिटी’साठी (इंटरनेटसाठी) सिद्ध करण्यात आला आहे. या माध्यमातून पृथ्वीवर ४ जी, ५ जी, व्हिडिओ कॉल सेवा अधिक सक्षम करण्यास साहाय्य होणार आहे.
Powered by India’s youth, our space programme is getting more advanced and impactful.
With LVM3 demonstrating reliable heavy-lift performance, we are strengthening the foundations for future missions such as Gaganyaan, expanding commercial launch services and deepening global… pic.twitter.com/f53SiUXyZr
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2025
पंतप्रधान मोदी यांच्याकडून इस्रोचे अभिनंदन
‘ब्यूबर्ड ब्लॉक २’चे यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले. त्यांनी ‘एक्स’वर म्हटले, ‘‘भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेला सर्वांत वजनदार उपग्रह नियुक्त कक्षेत स्थापित केला, हा भारताच्या अंतराळाच्या प्रवासातील अभिमानाचा टप्पा आहे. यामुळे भारताची क्षमता अधिक बळकट झाली आहे. भारत अशाच प्रकारे अधिकाधिक उंची गाठत राहील. इस्रोचे शास्त्रज्ञ आणि अभियंता यांचे अभिनंदन.’’
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !